विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नांदूर मधमेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. तसेच, नांदूर मधून 22 हजार 200 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे आणि हे पाणी आज शुक्रवारी रात्रीपर्यंत नाथसागर जलाशयात धडकणार असल्याची माहिती धरण सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून नाथसागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे तसेच दारणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा: 'सहकारी मॉडेलच्या आधारे राष्ट्रीय टॅक्सी योजना सुरू केली जाईल' - अमित शाह
गुरुवारी नांदूर मधमेश्वरमधून 22 हजार 200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. हे पाणी आज शुक्रवारी रात्री नाथसागर जलाशयात दाखल होणार आहे. विशेष म्हणजे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वरील धरणातून पाणी सोडण्यात आले असल्याने, हे पाणी आज शुक्रवारी रात्रीपर्यंत दाखल होणार असल्याने नाथसागर जलाशयाची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. आज शुक्रवारी सकाळी नाथसागर जलाशयात 29.66% पाणी पातळी होती. नाथसागर जलाशयाची एकूण साठवण क्षमता 1522 फूट आहे. आज सकाळी जलाशयात पाणी 1505 फूट, 458.980 मीटर, एकूण पाणीसाठा 1389.934 दशलक्ष लिटर घन मीटर, जिवंतसाठा 643.828 दशलक्ष लिटर घन मीटर, एकूण टक्केवारी 29.66% होती. नाथसागर जलाशयात नांदूर मधमेश्वरचे पाणी दाखल झाल्यानंतर पाणी पातळी झपाट्याने वाढणार आहे.