नांदेड: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आज नांदेड जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी अमित शाहा यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करून भारतीय सैन्याच्या शौर्य आणि धाडसाचे कौतुक केले. यावेळी अमित शाहा म्हणाले, 'त्यांनी (पाकिस्तानने) उरीवर हल्ला केला, आम्ही सर्जिकल स्ट्राईकने प्रत्युत्तर दिले. त्यांनी पुलवामावर हल्ला केला, आम्ही हवाई हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले. मग त्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला, आम्ही ऑपरेशन सिंदूरने प्रत्युत्तर दिले आणि त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.'
'गोळी'चे उत्तर 'गोळ्या'ने दिले जाईल - अमित शाह -
दरम्यान, जाहीर सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण जगाला संदेश दिला आहे की कोणीही भारतीय सैन्याला, भारतीय लोकांना आणि भारतीय सीमांना त्रास देऊ नये. अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. जर कोणी आपल्यावर (भारतावर) हल्ला केला तर 'गोळी'चे उत्तर 'गोळ्या'ने दिले जाईल.
हेही वाचा - 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान मोदींचा वडोदरामध्ये रोड शो
ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट -
देशात ऑपरेशन सिंदूरसोबतच आणखी एक ऑपरेशन सुरू होते. त्याचे नाव ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आहे. छत्तीसगडमधील या कारवाईअंतर्गत, आमच्या सीआरपीएफ, छत्तीसगड पोलिस आणि बीएसएफने 5 हजार फूट उंचीवर असलेल्या नक्षलवाद्यांच्या अड्डे उद्ध्वस्त केले आणि 31 नक्षलवाद्यांना ठार केले. आतापर्यंत 36 नक्षलवादी मारले गेले आहेत. अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. 31 मार्च 2026 पर्यंत आपण या देशातून नक्षलवादाचे उच्चाटन करू, असा दावाही यावेळी अमित शाह यांनी केला.
हेही वाचा - 'पाकिस्तानने सहकार्याची शेवटची संधी गमावली'; अमेरिकेत शशी थरूर यांचा दहशतवादावर जगाला संदेश
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना अमित शाहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले. नांदेडच्या जाहीर सभेत त्यांनी सांगितले की, जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली असती.