पुणे : दिनांक 10 फेब्रुवारी म्हणजे कालच सर्वत्र एकाच बातमीने खळबळ उडाली होती की, तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झालंय. खरतर हे कथित अपहरण असून माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंत हा बँकॉकवारी निघाला होता. घरात काहीही न सांगता ऋषीराज दोन मित्रांसोबत बँकॉक निघाला खरा परंतु त्याने संपूर्ण प्रशासनाला कामाला लावलं. अशातच मुलाचं अपहरण झालं म्हणून माजी मंत्री तानाजी सावंतांनी आपली राजकीय सूत्र हलवली.
हेही वाचा: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज हा कुणालाही न सांगता मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता. त्यासाठी त्याने 68 लाख रूपयांचे खासगी विमान बुक केले होते. पण मुलगा अचानक गायब झाल्यामुळे सावंत कुटुंबात खळबळ उडाली. मुलाचे अपहरण झाल्याचं वाटलं, त्यामुळे तात्काळ पोलिसांत गुन्हा दाखल केला.त्यानंतर माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आपली राजकीय सूत्र फिरवत केंद्रीय हवाई उड्डयण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांना फोन केला आणि बँकॉकला जाणारे विमान थांबवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान कौटुंबिक वादातून माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंत हा घरातून बाहेर पडला असल्याचं समोर आलं. त्यानंतर वडिलांनी म्हणजे तानाजी सावंतांनी पुणे पोलिसांवर दबाव आणून तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांनी खासगी विमान कंपनीला विमान चेन्नईला उतरवून घ्यायला भाग पाडले असल्याचं बोललं जातंय .दरम्यान या सर्व प्रकरणानंतर आमच्यात कुठलाही वाद नसल्याचं स्पष्टीकरण देखील देण्यात आलंय.