Saturday, July 20, 2024 11:28:31 AM

नवीन उद्योजकांना मिळणार रिक्त प्लॉट

नवीन उद्योजकांना मिळणार रिक्त प्लॉट

नागपूर, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राज्याच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या विविध एमआयडीसीमध्ये रिक्त असलेले प्लॉट नवीन उद्योजकांना देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) घेतला आहे. त्यामुळे नवीन उद्योजकांना प्लॉट मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. यानिमित्ताने अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कारखान्यांचा लिलाव करून ती जागा नवीन उद्योजकांना देण्याची मागणीही पुढे आली आहे. याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात नवीन उद्योग सुरू होऊन रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. 


सम्बन्धित सामग्री