१९ जुलै, २०२४ येवला : येवला येथे अंगणवाडी कर्मचारी महिलांचा थाळीनाद मोर्चा काढला.
केंद्र सरकारच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान वेतन १५,००० रुपये इतके मिळालेच पाहिजे, लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचारी महिलांना प्रथम प्राधान्य द्यावे, वीस लाखाची विमा संरक्षण मिळावे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. येवला येथे महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी महिलांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला. यावेळी, मोठ्या संख्येने शालेय पोषण आहाराच्या महिलांनी येवला तहसील कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढत सरकार विरोधात घोषणा दिल्या.