संभाजीनगर: विभागीय क्रीडा संकुलाचा 21.59 कोटींच्या घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. पोलिसांकडून या सर्व रकमेतून घोटाळ्याचा मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरने खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू आहे.. पाच चष्यांपैकी विदेशात दुरुस्तीसाठी पाठवलेला 16 लाख रुपयांचा हिरेजडित चष्मा पोलिसांनी जप्त केला. हर्षकुमार क्षीरसागर याने संकुलासाठी आलेल्या निधीतून 21.59 कोटी रुपयांचा घोटाळा केला. त्यातून आलिशान फ्लॅट, महागड्या गाड्या, हिरेजडित चष्यांसह विदेशी वाऱ्याही केल्या. हर्षकुमारने घोटाळ्याच्या रकमेतून 40 लाख रुपयांचे पाच चष्मे खरेदी केले होते. एका वादाच्या दरम्यान त्याचा यातील एक १६ लाख रुपयांचा 180 हिऱ्यांचा चष्मा फुटला होता. तो दुरुस्तीसाठी त्याने विक्रेत्याच्या माध्यमातूनच जर्मनीला अडीच लाख रुपयांमध्ये पाठविला होता. पोलिसांनी त्याच विक्रेत्याच्या माध्यमातून तो पुन्हा मागवून जप्त केला.
हेही वाचा: आर्ची होणार महाडिकांची सून?
संकुलाचा 21.59 कोटींच्या घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. पोलिसांकडून या सर्व रकमेतून घोटाळ्याचा मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरने खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू असून, पाच चष्यांपैकी विदेशात दुरुस्तीसाठी पाठविलेला 16 लाख रुपयांचा हिरेजडित चष्मा पोलिसांनी जप्त केला. हर्षकुमार क्षीरसागर याने संकुलासाठी आलेल्या निधीतून 21.59 कोटी रुपये ढापले. त्यातून आलिशान फ्लॅट, महागड्या गाड्या, हिरेजडित चष्यांसह विदेशी वाऱ्याही केल्या. हर्षकुमारने घोटाळ्याच्या रकमेतून 40 लाख रुपयांचे पाच चष्मे खरेदी केले होते. एका वादाच्या दरम्यान त्याचा यातील एक १६ लाख रुपयांचा 180 हिऱ्यांचा चष्मा फुटला होता. तो दुरुस्तीसाठी त्याने विक्रेत्याच्या माध्यमातूनच जर्मनीला अडीच लाख रुपयांमध्ये पाठविला होता. पोलिसांनी त्याच विक्रेत्याच्या माध्यमातून तो पुन्हा मागवून जप्त केला.
घोटाळेबाजाची संपत्ती?
हर्षकुमार क्षीरसागर संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलातील कंत्राटी कर्मचारी
हर्षकुमारचा क्रीडा उपसंचालकांची बनावट सही करुन बँकेशी व्यवहार
स्वत:चा मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरुन 21 कोटी 59 लाखांचा घोटाळा
घोटाळ्यानंतर 4 महिन्यांत दीड कोटींची बीएमडब्ल्यू कार खरेदी
32 लाखांची बीएमडब्ल्यू दुचाकी खरेदी
मैत्रिणीसाठी हायप्रोफाईल एरियात 4 बेडरुमचा प्लॅट
40 लाख रुपयांचे 5 चष्मे खरेदी
16 लाखांच्या हिरेजडीत चष्म्याची जोरदार चर्चा