Accident On Mumbai-Nagpur highway
Edited Image
बुलढाणा: मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा येथे मुंबई-नागपूर महामार्गावर विटांनी भरलेली बस आणि मेटोडोरमध्ये मोठी टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की बस आणि मेटोडोरचा चक्काचूर झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दहा ते पंधरा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा - बीड जिल्हा रुग्णालयात माता मृत्यूचे सत्र सुरू; सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू
मुंबई-नागपूर महामार्गावर बस आणि मॅटाडोरची टक्कर-
प्राप्त माहितीनुसार, नांदुरा तालुक्यातील आमसरी गावाजवळ मुंबई-नागपूर महामार्गावर एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. विटांनी भरलेली मेटाडोर आणि मध्य प्रदेश परिवहनची एसटी बस यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात मॅटाडोरमध्ये बसलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला. तर बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचाही मृत्यू झाला. याशिवाय एसटी बसमधील दहा ते पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले.
हेही वाचा - आई नव्हे, वैरीण! प्रियकराच्या मदतीने मुलीचे अश्लील व्हिडिओ केले व्हायरल
दरम्यान, स्थानिक लोकांनी तातडीने पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर काहींना पुढील उपचारांसाठी खामगाव रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. पोलिस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.