महाराष्ट्र: महायुती सरकारची सर्वात प्रसिद्ध आणि फायदेशीर योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सर्वच लाडक्या बहिणी लाडकी भिन्न योजनेच्या हप्त्याची वाट पाहताय. त्यातच लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीय. महिला दिनानिमित्त राज्य सरकार लाडक्या बहिणींना खास गिफ्ट देणारे. आज राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रूपये जमा होणार आहे. आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात होणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना पैसे दिले जात आहेत.
हेही वाचा: Mumbai Local : 15 डब्ब्यांच्या लोकल दुप्पट होणार..
याबाबत अधिक माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय. 'महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हफ्ता आज आपण महिलांच्या थेट खात्यात वितरित करत आहोत. आम्ही या दोन्ही महिन्यांचा लाभ महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार लाडक्या बहिणींना देण्यास सुरूवात केली आहे.' असं माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
दरम्यान महिला दिनानिमित्त राज्य सरकार लाडक्या बहिणींना खास गिफ्ट देणारे. त्यातच आज राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रूपये जमा होणार आहे. आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात होणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना पैसे दिले जात आहेत. यामुळे राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.