मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे की, "आमच्यातील सर्व गाळ गेलेला असून, जे राहिले आहेत ते राहणारच आहेत." राऊत म्हणाले, "ज्यांनी पक्षाशी बेइमानी केली ते गेले आहेत, त्यामुळे आता आमच्यातून कोणीही जाणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठाम असणारे आमच्या सोबत आहेत. मात्र, शिंदे यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांनी ‘पैसा फेको, तमाशा देखो’ ही विचारधारा महाराष्ट्रात आणली आहे, पण ती बाळासाहेबांची विचारधारा नाही."
तसेच "महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे. हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातीलच असेल." शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत राऊत म्हणाले, "ते ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळाले आहेत. अशा लाचारीचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वेश्याचे राजकारण म्हणत असत." राऊत यांनी शिंदे यांच्यावर पुस्तक आणि वर्तमानपत्र न वाचण्याचा आरोपही केला.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटले की, "जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला आम्ही उखडून फेकू. यात थोडा वेळ लागेल, पण ते होणारच."
राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल करताना म्हटले की, "अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची लाचारी म्हणजे इतिहासकाळात मुजरा करण्यासारखी आहे. त्यामुळे त्यांना कधीच प्रतिष्ठा मिळणार नाही."
"ते बावनकुळे नाही, तर रावणकुळे आहेत."
राऊत यांनी बावनकुळे यांच्यावर टीका करत म्हटले, "600 कोटी रुपयांचा भूखंड एका रुपयाला घेतल्याचा प्रकार घडला आहे. हा भूखंड मिळवून महाराष्ट्राची लूट करण्यात आली. अशा व्यक्तीला महसूल मंत्री बनवणे हे मोठे पाप आहे. "ईडी आणि सीबीआय या प्रकरणावर गप्प का आहेत?" ईडी आणि सीबीआयने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी.
👉👉 हे देखील वाचा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गोंदियात मोठं खिंडार
"भाजपाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. यावर राऊत म्हणाले, "शेतकऱ्यांना कर्जमाफी न केल्यास जाहीरनामा खोटा ठरतो. सरकारने या संदर्भात जनतेला उत्तर द्यावे."
उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यावर राऊत म्हणाले, "हा केवळ मुंबईकरांसाठीचा मेळावा होता. बाहेरील पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी नियोजित होती आणि ती काळजी करण्याची गरज नाही."
👉👉 हे देखील वाचा : रिक्षाचालकाकडून बलात्कार; पीडितेच्या गुप्तांगात सर्जिकल ब्लेड आणि दगड सापडले