रायगडमध्ये सातत्याने ठाकरे गटाला धक्का बसत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता पुन्हा एकदा रायगडमध्ये ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार आहे. रायगड जिल्हयात राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटाच्या महाडमधील विधानसभेच्या उमेदवार स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी स्नेहल जगताप यांचे काका हनुमंत जगताप तसेच प्रमुख पदाधिकारी आज सुतारवाडीत भेट घेवून अंतिम चर्चा करणार आहेत.
हेही वाचा: Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याची पूर्वतयारी आणि त्याचे महत्व
स्वतः स्नेहल जगताप या चर्चेला उपसथित राहणार नसल्याची सुत्रांची माहिती आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू आहे. त्यामुळे भरत गोगावले यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी ही खेळी खेळली असल्याची चर्चा सध्या रायगडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मध्यंतरी स्नेहल जगताप यांचे भाजप प्रवेशासाठीदेखील प्रयत्न सुरू होते.
कोण आहेत स्नेहल जगताप ?
स्नेहल जगताप काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय माणिक जगताप यांच्या कन्या
महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काम
2 वर्षांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश
2024 मध्ये विधानसभेत भरत गोगावलेंविरोधात निवडणूक लढवली
निवडणुकीत तटकरेंनी जगतापांना मदत केल्याचा गोगावलेंचा आरोप
दरम्यान या आधीदेखील रायगड जिल्ह्यात अनेक नेत्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकलाय त्यातच आता पुन्हा ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली असून रायगड जिल्हयात राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटाच्या महाडमधील विधानसभेच्या उमेदवार स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत.