Sunday, August 17, 2025 05:10:06 PM

Mahadev Munde Case: नवऱ्याची हत्या; पत्नी उपोषणावर ठाम

परळीतले व्यापारी महादेव मुंडे यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. यानंतर अद्यापही याप्रकरणी कुठला ठाम तपास समोर आलेला नाही. त्यातच आता महादेव मुंडे हत्येतील अल्टिमेटम आज संपणार आहे.

mahadev munde case नवऱ्याची हत्या पत्नी उपोषणावर ठाम

परळीतले व्यापारी महादेव मुंडे यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. यानंतर अद्यापही याप्रकरणी कुठला ठाम तपास समोर आलेला नाही. त्यातच आता महादेव मुंडे हत्येतील अल्टिमेटम आज संपणार आहे. त्यामुळे 'तत्कालीन पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा' अशी मागणी होत असून ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणावर ठाम असल्याचं देखील समोर आलंय. 

हेही वाचा: शिंदेंना घेरण्यासाठी ठाण्यात जनता दरबार?

याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव मुंडे यांच्या पत्नी यांनी पोलीस प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम आज संपतो आहे. त्यामुळे आज रात्री पर्यंत पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींबाबत ठोस कारवाई करावी. अन्यथा उपोषणावर ठाम असल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. त्याबरोबरच तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि तपास यंत्रणेतील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे सीडीआर तपासावे, अशी मागणी देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस परळी दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर त्यांनी हत्या झालेले व्यापारी महादेव मुंडेंच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी महादेव मुंडेंच्या पत्नी त्याचबरोबर कुटुंब भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान परळीतले व्यापारी महादेव मुंडे यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. यानंतर अद्यापही याप्रकरणी कुठला ठाम तपास समोर आलेला नाही. त्यातच आता महादेव मुंडे हत्येतील अल्टिमेटम आज संपणार आहे. त्यामुळे 'तत्कालीन पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा' अशी मागणी होत असून ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणावर ठाम असल्याचं देखील समोर आलंय.  
 


सम्बन्धित सामग्री