मुंबई : भारतीय डाक विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती एकूण 21 हजारांहून अधिक जागांसाठी भरती होणार आहे. ग्रामीण डाकसेवक पदासाठी ही भरती सुरू आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भारतीय डाक विभागात काम करण्यासाठी इच्छुक उमेदवार 3 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.
भारतीय डाक विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. पोस्टामध्ये डाकसेवक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही किंवा कोणतीही मुलाखत होणार नाही. फक्त दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांना पोस्टामध्ये नोकरी लागणार आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या शेवटच्या तारखीची वाट बघू नका. कारणा नंतर सर्वरची समस्या येऊ शकते. त्यामुळे उमेदवारांनी आधी अर्ज केलेला चांगला आहे. भारतीय डाक विभागात अर्ज करणाऱ्या जनरल आणि ओबीसी समुदायातील उमेदवारांना 100 रूपये परीक्षा शुल्क असणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्लूडी आणि महिला उमेदवारांना कोणताही परीक्षा शुल्क नसणार आहे.
हेही वाचा : पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 'या' दिवशी जारी केला जाणार; योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या..
भारतीय पोस्टामधील ब्रांच पोस्टमास्टर पदासाठी वेतमश्रेणी 12 हजार ते 29 हजार 380 रूपये असणार आहे. तर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर पदासाठी 10 हजार ते 24 हजार 470 रूपये वेतनश्रेणी असणार आहे. तसेच सातत्य भत्त्याअंतर्गत वेतन दिले जाईल. याशिवाय, GDS चे सर्व नियम पूर्ण केल्यानंतर, 3 टक्के वार्षिक वेतनवाढ देखील दिली जाईल. मूळ वेतनासोबतच GDASH कर्मचाऱ्यांना सरकारी नियमांनुसार महागाई भत्ता (DA) मिळेल. याशिवाय GDS ग्रॅच्युइटी, सर्व्हिस डिस्चार्ज बेनिफिट स्कीम (NPS प्रमाणे) चे फायदे देखील उपलब्ध असतील.
भारतीय डाक विभागात अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 40 वर्षे असणे अनिवार्य आहे. सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. या भरतीसाठी अनेक राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदारांना ज्या राज्यातील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. भारतीय डाक विभागात ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच मास्टर, डाक सेवक या पदांसाठी भरती होणार आहे.