महाराष्ट्र: गेल्या काही दिवसांपासून राज्यात 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चां जोरदार सुरू आहेत. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे काही खासदार महायुतीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाकरे गटातील अनेक नेते शिवसेनेत सामील होणार असल्याचं सांगत राज्यात पुन्हा एकदा उठाव होणार असल्याचं भाकीत शिवेसनेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी वर्तवलंय. त्यांच्या विधानांवरून ठाकरे गटातअधिक चलबिचल निर्माण झाली आहे.
हेही वाचा: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; वाचा सविस्तर
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून अडीच वर्षांपासूनच ऑपरेशन टागयरची सुरूवात झाली आहे. शिवसेनेची पंरपरा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम सुरूच असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय. ठाकरे गटातून शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढत असून आगे आगे देखो होता है क्या असं सूचक विधान शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलंय. ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा लवकरच पाहायला मिळेल असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय.
ठाकरे गटाला मोठी गळती लागली असून गेल्या दोन दिवसात कोकणातील ठाकरे गटांचे नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाने तातडीने मातोश्रीवर नेत्यांची बैठक बोलावून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याची पहिली बैठक रविवारी पार पडली, त्याता रत्नागिरीमधील पदाधिकाऱ्यांची बाजू समजावून घेतील गेली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी कोणीही सोम्या-गोम्या ठाकरे गटाला संपवणार नसल्याचा दावा त्यांनी केलाय.
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर बाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून जसजशा आगामी पालिका निवडणुका जवळ येतील तसे शिवेसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढेल असा दाव शिवसेनेचे सर्वच नेते करत आहेत.ठाकरे गटाच्या नेतृत्वाकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच नेते नाराज असल्याचा दावा शिवसेनेच्यावतीने केला जात आहे. नेते आणि पदाधिकारी सत्तेसोबत राहण्याच्या मनस्थितीत असतात, त्याचाच उपयोगकरून ठाकेर गटातील नेत्यांना शिवेसेनेत सामावून घेत एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर यशस्वी करण्याच्या तयारीत आहेत.