Sunday, August 17, 2025 05:21:10 PM

भिवंडीत आईसह तीन मुलींची आत्महत्या; वडील ड्युटीवरून घरी आले अन्...

भिवंडीत आईने तीन मुलींसह घरातच गळफास लावून आत्महत्या केली आहे.



भिवंडीत आईसह तीन मुलींची आत्महत्या वडील ड्युटीवरून घरी आले अन्

भिवंडी: भिवंडी शहरातील कामदघर येथील फेणे पाडा परिसरात घटना घडली असून एकच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे झाली आईने तीन मुलींसह घरातच गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना सकाळी पहाटे उघडकीस आली असून  संबंधित महिलेचा पती रात्रीची ड्युटी करून सकाळी घरी आल्यावर समजलं त्याने दरवाजा बंद असल्याचं पाहिलं आणि खिडकीतून पाहिल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला घरात पत्नी आणि तीन मुली लटकलेल्या दिसल्या.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच भिवंडी शहर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. संबंधित महिलेनं हे टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस मृत्यूपूर्व चिठ्ठी आणि कौटुंबिक पार्श्वभूमी तपासत आहेत. 


सम्बन्धित सामग्री