मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 2025 मधील 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. यावर्षी 10वीच्या परीक्षा 18 मार्चला आणि 12वीच्या परीक्षा 4 एप्रिलला पार पडल्या असून, निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ते अधिकृत वेबसाइट्स आणि डिजीलॉकरवरून पाहता येणार आहेत. डिजीलॉकर हे डिजिटल प्रमाणपत्रांची खात्रीशीर आणि अधिकृत पद्धत आहे.
CBSE Result 2025 पाहण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन (Website वरून):
1. तुमचा ब्राउझर उघडा आणि results.cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. “CBSE 10th Result 2025” किंवा “CBSE 12th Result 2025” या लिंकवर क्लिक करा.
3. तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी कोड एंटर करा.
4. सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
5. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा PDF डाउनलोड करा.
DigiLocker वरून CBSE Result 2025 पाहण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया:
1. ब्राउझर उघडा आणि अधिकृत वेबसाइटला जा – www.digilocker.gov.in
2. “Student Academic Documents” मध्ये CBSE Class 10 या CBSE Class 12 निवडा.
3. खालील माहिती भरा:
• तुमचा रोल नंबर
• शाळेचा कोड
• शाळेकडून मिळालेला 6 अंकी सिक्युरिटी पिन
4. माहिती भरल्यानंतर Next बटणावर क्लिक करा.
5. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल – तो एंटर करा.
6. OTP पडताळल्यावर तुमचं डिजीलॉकर अकाउंट अॅक्टिवेट होईल.
7. आता “Go to DigiLocker account” वर क्लिक करा.
8. डॅशबोर्डमध्ये Documents सेक्शनमध्ये तुमचा CBSE Board Result 2025 उपलब्ध असेल.
9. तुम्ही तो डाऊनलोड, सेव्ह करू शकता आणि प्रिंट आउट देखील घेऊ शकता.
महत्वाचं: आधीच डिजीलॉकरवर अकाउंट असलेल्यांनी थेट लॉगिन करून वरील माहिती टाका आणि निकाल पाहा.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स:
• cbse.gov.in
• cbseresults.nic.in
• results.digilocker.gov.in
• umang.gov.in
मोबाईल अॅप्स (Android आणि iOS वर उपलब्ध):
• DigiLocker App
• UMANG App
गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करून, वरीलप्रमाणे सर्व स्टेप्स फॉलो करा.