नाशिक : नाशिकला वाईन कॅपिटल म्हणून ओळखले जाते आणि येथे सुला फेस्टच्या आयोजनाने शहरात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. पाच वर्षांच्या खंडानंतर, यंदा पुन्हा एकदा नाशिकच्या प्रसिद्ध सुला विनीअर्ड्समध्ये सुला फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात देशभरातून पर्यटक आले आहेत, ज्यामुळे नाशिकच्या पर्यटन उद्योगाला पुन्हा एक उठाव मिळाला आहे.
सुला विनीअर्ड्स ही देशातील सर्वात मोठी वाईन उत्पादन करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. याआधी दरवर्षी सुला विनीअर्डमध्ये सुला फेस्टचे आयोजन होत होते, परंतु गेल्या पाच वर्षांच्या गॅपनंतर यंदा परत एकदा या फेस्टला आयोजन करण्यात आले आहे. सुला फेस्ट हा केवळ एक वाईन टेस्टिंग फेस्टिव्हल नसून, एक संगीतमहोत्सव देखील आहे, ज्यामध्ये आशियातील अग्रगण्य कलाकारांच्या सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले आहे.
👉👉 हे देखील वाचा : 'नैराश्यामुळे राज ठाकरेंचं वक्तव्य' राष्ट्रवादीचा पलटवार
सुला फेस्टच्या पहिल्या दिवशी 5000 हून अधिक रसिकांनी उपस्थिती दर्शवली आणि संगीताच्या धमाल सादरीकरणांचा आनंद घेतला. या संगीत महोत्सवात विविध प्रकारच्या संगीताचा अद्भुत संगम पाहायला मिळाला, ज्यात आधुनिक संगीतापासून पारंपारिक ध्वनींचा देखील समावेश होता. सुला फेस्टमध्ये असलेली वाईन टेस्टिंग आणि संगीत महोत्सव यामुळे पर्यटकांना एक अभूतपूर्व अनुभव मिळाला आहे.
सुला वाइनच्या व्हॉइस प्रेसिडेंट मोनित डवले यांनी सांगितले की, “सुला फेस्ट हा एक अद्वितीय अनुभव आहे, जो प्रत्येक वर्षी पर्यटकांना विविध संस्कृतींचे मिश्रण आणि उत्तम संगीताचा अनुभव देतो.” याच प्रकारे, पर्यटकांनीही सुला फेस्टच्या आयोजनाचे तोंडभरून कौतुक केले आणि यंदाच्या फेस्टला दिलेल्या प्रतिसादाबद्दल अभिप्रेत आनंद व्यक्त केला.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.