“मराठवाड्याचा दुष्काळ त्यांना कर्जतमध्ये आणायचाय…” कर्जतमधील जंगलतोडीवर आदित्य ठाकरे आक्रमक

कर्जत परिसरातील जंगलतोडीच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

“मराठवाड्याचा दुष्काळ त्यांना कर्जतमध्ये आणायचाय…” कर्जतमधील जंगलतोडीवर आदित्य ठाकरे आक्रमक
Aaditya Thackeray On Karjat Project

कर्जत तालुक्यातील साई डोंगर येथे प्रस्तावित टोरंट जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी 20 ऑक्टोबरपासून वृक्षतोड सुरू करण्यात आली होती. या परिसरातील हजारो वृक्षांची तोड करण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष आणि पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध केला. त्यानंतर आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि मनोज जरांगे-पाटील यांनी प्रकल्पाबाबत विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कर्जत-भीमाशंकरच्या जंगलात प्रस्तावित टोरंट प्रकल्पावरून राजकारणचांगलंच तापलं आहे. अशातच कर्जत परिसरातील जंगलतोडीच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. कर्जतमधील जंगलतोड आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहेत. सरकारवर निराश आहे हताश आहे. आजचा मुख्यमंत्री यांचा आवडतीचा विषय विनाश आणि विकास आहे. मी हिंजवडीमध्ये होतो it मध्ये काम करतात तिकडे लोक जुलै पासून जे आंदोलन तिकडे पुकारलं आहे. जुलैमध्ये बघितलं मेट्रो तयार होती vip कोणते माहिती नाही ज्यांना वेळ नाही उदघाटन ची वेळ नाही म्हणून टेस्टिंगचालू आहे सांगण्यात येत. 3 नोव्हेंबर तारीख ठरली होती मग पुढे ढकलली जर यां दिवशी झालं नाही तर मेट्रो ला घेराव घालायचं ठरलं होत तर पंतप्रधान 3 तारखेला ऑनलाईन उदघाट्न करणार आहेत. उदघाट्न लांबली कि लांबवली गेली त्याचा विकास होत आहे. प्रदूषित पाणी त्यांच्या घरी जात.”

हेही वाचा- “प्रकल्प झाला नाही तर…,त्यासाठी झाडे तोडावी लागेल” विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

“अदानी किंवा तोरेन्टला झाड कापायला सरकार देत ती मेहनत लोकांसोबत केली पाहिजे. कर्जतमध्ये ते जंगल आहे इको सेन्सिटिव्ह जागा आहे घर बांधण्याला देखील विरोध होयचा पण आता फौजफाटा आहे तिकडे. गुजरातच्या एका कंपनीला मुख्यमंत्री हो बोलतात इको सेन्सिटिव्ह कि इगो सेन्सिटिव्ह म्हणायचं याला. हा प्रकल्प वीज निर्मितीचा नसून पंप स्टोरेजचा आहे. दिवसा स्टोरेज energy मधून येते त्याने वीज निर्मिती होतें. मुख्यमंत्री सांगतात 5 हजार वेगा व्होट किती ते वेगा व्होट कि मेगा वाट लावत आहेत. पंप स्टोरेजचा जगात कुठे ही प्रोजेक्ट पाहिलात तर खेचून खेचून 50 60 जॉब निर्माण होऊ शकतात. इकडे मेंटेनन्स साठीच माणस लागणार. ही गुंतवणूक रिपेर मेंटेनन्समध्ये जाणार. मुख्यमंत्री यांनी सांगावं प्रोजेक्ट अँप्रोव्ह करताना सह्याद्रीच का नेमले? शिव छत्रपती स्वतः आणि अनेक मावळे मोठे झाले तेच दरे खोरे तुम्हाला पोखरयचे आहेत. तिकडे आम्ही बघितलं काही झाडांवर नंबर आहेत काही झाडांवर नंबर नाहीत. 300 कोटी झाडे लावायला जागा कुठे आहे ते सांगा जंगल टिकवलंय का तुम्ही? मुख्यमंत्री यांनी जाहीरपणे सांगावं.”

“मुख्यमंत्री सांगत होते मराठवाड्याचा दुष्काळ पाहिलं पुढचे बघणार नाहीत हा दुष्काळ त्यांना कर्जतमध्ये आणायचा आहे काय? या कंपनीचे धागे दोरे कुठे जातात हे लक्षात घ्या. महाराष्ट्र पोखरण्याची घाई गडबड कशासाठी मग? अनेक विकास कामात काही ठिकाणी झाड कापली जातात झाड शिफ्ट करावी लागतात आम्ही आक्षेप घेतोय ते सर्व इको सेन्सिटिव्ह जागा आहे. अदानी प्रकल्पसाठी परवानगी दिलेय जंगलच आणि जीवनाचं नाळ तोडत आहात. महाराष्ट्रानी काय पाप केलंय कि त्यांना असे मुख्यमंत्री लाभलेत. उद्याच्या राज साहेबांच्या सभेवर सर्वांचेच लक्ष असेल. काल मला bjp चे लोक भेटले त्या जंगलात त्यांचा ही विरोध होता वृक्षतोडीला.”

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number