बंडखोरांचं ग्रहण, अमरावतीत कोणाचं पारडं जड? महायुती-मविआमध्ये मुख्य लढत

अमरावतीमध्ये महायुतीचे किरण सरनाईक विरुद्ध काँग्रेसच्या प्रा. आदिती पोहरे यांच्यात अटीतटीची थेट लढत पाहायला मिळेल.

बंडखोरांचं ग्रहण, अमरावतीत कोणाचं पारडं जड? महायुती-मविआमध्ये मुख्य लढत
Amravati Election

सुरेंद्र आकोडे, प्रतिनिधी 

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला आज, 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. 14 टेबल्सवर मतमोजणी होत असून अवैध मते वगळून विजयाचा कोटा ठरणार आहे. अमरावतीमध्ये महायुतीचे किरण सरनाईक विरुद्ध काँग्रेसच्या प्रा. आदिती पोहरे यांच्यात अटीतटीची थेट लढत पाहायला मिळेल. प्राधान्यक्रमाच्या मतमोजणीमुळे निकालाला 24 तासापेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यभर लक्ष लागून असलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला अखेर सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत रिंगणात असलेल्या तब्बल 26 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतमोजणीच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, काँग्रेस सत्ता राखणार? की भाजपचा होणार आमदार?

अमरावती येथील लोकशाही भवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडत असून, यासाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी 14 टेबल्सची सोय करण्यात आली आहे. या निवडणुकीत विक्रमी ९२ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्यामुळे मतपत्रिकांची संख्या मोठी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सर्व मते एकत्र करून अवैध ठरलेली मते वेगळी काढली जाणार आहेत. या निवडणुकीत 35,810 पैकी 33,034 मतदान झाले. वैध मते बाजूला काढल्यानंतर विजयासाठी आवश्यक असणारा कोटा निश्चित केला जाणार आहे. महायुतीचे किरण सरनाईक यांच्या पाठीशी भाजप आणि मित्रपक्षांची ताकद उभी राहिली असून नेत्यांनी प्रचारात मोठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दुसरीकडे, काँग्रेसच्या प्रा. आदिती पोहरे यांच्या मागे शिक्षण क्षेत्रातील जुन्या जाणत्या ‘शिवाजी शिक्षण संस्था’ आणि महाविकास आघाडीचे नेटवर्क सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय ठाकरे गटाचे उमेदवार आणि काही बंडक्षोभामुळे मतांचे समीकरण कसे बदलते, यावरही सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे प्रमुख उमेदवार

  • महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक
  • काँग्रेसच्या उमेदवार प्रा. आदिती पोहरे
  • शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार दत्तात्रय लहाने
  • भाजपच्या बंडखोर उमेदवार खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे
  • भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर भोयर (आमदार राजेश वानखडे यांचे मेव्हुणे)
  • शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर माजी आमदार श्रीकांत देशपांडे
  • विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे उमेदवार दिलीप कडू

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number