Sunday, August 17, 2025 01:45:00 AM

मोठी अपडेट; उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी

राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांच्या नाहूर येथील 'मैत्री' निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देण्यासाठी आले.

मोठी अपडेट उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी

मुंबई: राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांच्या नाहूर येथील 'मैत्री' निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देण्यासाठी आले. जेव्हा संजय राऊत तुरुंगात गेले होते, तेव्हा स्वत:  उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आई आणि कुटुंबाची भेट घेतली होती. त्यानंतर, शनिवारी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या निवासस्थानी आले. ही भेट कौटुंबिक असल्याचे सांगितले जात आहे. 

हेही वाचा: नाचता येईना अंगण वाकडं; उपाध्येंची उद्धव ठाकरेंवर टीका

संजय राऊत यांच्या मातोश्रींची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे पत्नी त्यांच्या रश्मी ठाकरे यांच्यासोबत राऊतांच्या निवासस्थानी दाखल झाले अशी माहिती समोर आली आहे. 19 जुलै 2025 रोजी 'सामना' वृत्तपत्राच्या पहिल्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली आहेत. 


सम्बन्धित सामग्री