मुंबई: 20 जुलै रोजी माणिकराव कोकाटे भर सभागृहात रमी खेळताना दिसल्याने अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला. काही दिवसांपूर्वी, माणिकराव कोकाटेंनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'सरकार भिकारी आहे', असं वादग्रस्त वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केले होते. यामुळे, अनेक नेत्यांनी माणिकराव कोकाटेंवर टीका केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सरकारची बदनामी होत आहे. अशातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना कडक शब्दांत इशारा दिला. 'इथून पुढे एकही चूकीचा प्रकार खपवून घेणार नाही', असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हेही वाचा: अतिरेकी मेल्याचं तुम्हाला दुःख झालंय का?; अमित शाह यांचा विरोधकांना सवाल
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मंगळवारी, राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर, तब्बल 20 मिनिटे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांचा क्लास घेतला. या दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'वादग्रस्त विधाने, वादग्रस्त कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते. ही अखेरची संधी, काय कारवाई करायची ती करूच. आता एकही प्रकार खपवून घेणार नाही. तसेच, त्यांनी जे चूका करतात, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल'. यावेळी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी, ग्रामविकास, कायदा आणि न्याय या विभागांतर्गत विविध तरतुदी करण्यात आले.