‘महायुतीत असलो तरी आमचा पक्ष स्वतंत्र’ शंभूराज देसाईंच्या विधानाने खळबळ; राजकीय चर्चांना फोडणी

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीतील पक्षांच्या भूमिकांवरून विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाची संघटना आणि पक्षवाढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

‘महायुतीत असलो तरी आमचा पक्ष स्वतंत्र’ शंभूराज देसाईंच्या विधानाने खळबळ; राजकीय चर्चांना फोडणी
Maharashtra Politics

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीतील पक्षांच्या भूमिकांवरून विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाची संघटना आणि पक्षवाढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. “आम्ही महायुतीमध्ये असलो, तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी शिवसेनेची स्वतंत्र राजकीय ओळख अधोरेखित केली.

यावेळी शंभूराज देसाई म्हणाले की, “आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहे. माघार घ्यायला अजून अवधी आहे त्यामुळे जेव्हा केव्हा माघार होईल नाही माघार घ्यायची मुदत संपलेली आहे. त्यामुळे आता चित्र स्पष्ट आहे पण आमची चर्चा झाली ती संघटना वाढवणे संघटना तळागाळामध्ये पोहोचवणे आणि संघटनेन शिवसेनेन महायुती धर्म पाळणे एवढी आहे. आम्ही आमची संघटना वाढवणार त्यांची संघटना वाढवणार आम्ही शेवटी बघा महायुतीमध्ये जरी असलो तरी आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत. आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आम्ही शेवटी आमचा पक्ष वाढवणार, पण अंतिमत आम्ही सगळे महायुती म्हणून सरकारमध्ये एकत्र आहोत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील घटक पक्षांच्या स्वतंत्र भूमिकांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील समन्वय, तसेच प्रत्येक पक्षाची स्वतंत्र राजकीय रणनीती याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली! जयंत पाटील–फडणवीसांची चर्चा सुरु असताना पवारांनी जे केलं त्याने वेधलं सर्वांच लक्ष

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा तिढा सुटला
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये वेगळी भूमिका दिसत आहे. या जागेसाठी एकनाथ शिंदे पहिल्या दिवसापासूनच आग्रही होते. मात्र अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला असून भाजप आणि शिवसेनेत मैत्रिपूर्ण लढत होणार असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिदेंची शिवसेना सचिन सानप यांना पाठिंबा देणार तर भाजप आणि इतर मित्र पक्ष कौस्तुभ गावडेंना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीच्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

आता पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमधील घटक पक्षांमध्येच मैत्रीपूर्ण सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री उदय सामंत यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना आणि भाजपच्या मैत्रिपूर्ण लढतीचा निर्णय झाला असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून या एका जागेसाठी महायुतीत अंतर्गत खलबतं देखील वाजत होते. एकनाथ शिंदे यादरम्यान दिल्ली दौऱ्यावरही गेले होते. मात्र, शेवटच्या क्षणी मोठी खेळी करण्यात आली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number