महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फूट हा एक मोठा वाद ठरला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. नुकत्याच झालेल्या मुंबईतील एका बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
शिंदे म्हणाले, “देशाला हिंदुत्वाचे विचार देणारे एकमेव नेते बाळासाहेब ठाकरे होते. मात्र, तुम्हाला खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं. जर तुम्ही मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती. सहकाऱ्यांना नोकर समजण्याची तुमची वृत्तीच पक्षाच्या तुकड्यांना जबाबदार आहे.”याशिवाय, शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षाच्या कार्यपद्धतीबाबतही टीका केली. “शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. तो कोणा एका कुटुंबाचा नाही. तुम्ही लोकांना मालक आणि नोकर समजून चालला आहात, पण अशाने पक्ष कधी मोठा होत नाही,” असे शिंदे म्हणाले.
शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढते, पण तुमच्याकडून का जातात?
ग्रामपंचायत निवडणुकांवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोक मोठ्या संख्येने आमच्या गटात सामील होत आहेत, पण तुमच्याकडून ते का दूर जात आहेत याचे आत्मपरीक्षण करा. फक्त घटनाबाह्य बोलून काही साध्य होत नाही.”
त्यांनी पुढे महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराचा उल्लेख करत उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला. “एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाचा सन्मान केला तर तुम्हाला त्रास होतो. शिव्या देताना तुम्ही महादजी शिंदे यांच्या वंशजांचा आणि साहित्यिकांचा अपमान करता. हे योग्य नाही,” असा थेट आरोप शिंदेंनी केला.
हेही वाचा : सरपंच देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धसांची डील पक्की - संजय राऊतांचा गंभीर आरोप
महायुतीत कोणतेही कोल्ड वॉर नाही, तर विकास विरोधकांविरोधात युद्ध!
महायुतीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “आमच्या युतीत कोणतेही कोल्ड वॉर नाही. आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत. पण काही लोक विकासाच्या विरोधात काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेले अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचे काम मोदी-शाह यांच्या सरकारने केले. पण तरीही तुम्ही त्यांच्यावरच टीका करत आहात. सकाळ संध्याकाळ शिव्या देऊन तुम्ही शिवसेनेचा ‘शिव्यासेना’ केला आहे का?” असा सवालही शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला.