Saturday, August 16, 2025 09:40:49 PM

हिंमत असेल तर तुमच्या संपत्तीची चौकशी करा; खडसेंनी साधला महाजनांवर निशाणा

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच, मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप काही केल्या कमी होईना.

हिंमत असेल तर तुमच्या संपत्तीची चौकशी करा खडसेंनी साधला महाजनांवर निशाणा

जुगल पाटील. प्रतिनिधी. जळगाव: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच, मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप काही केल्या कमी होईना. बुधवारी, पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'आपल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे', असे वक्तव्य खडसेंनी केले. 

काय म्हणाले एकनाथ खडसे?

'आपल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे. आतापर्यंत, आपल्या सांगण्यावरून पाच वेळा माझ्या संपत्तीची चौकशी करण्यात आली आहे. माझ्याबाबतीत काय चौकशी करायची आहे ती करा. मात्र, जर मंत्री गिरीश महाजन यांच्यात हिंमत असेल तर, त्यांनी त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी', यानवेळी, महाजनांविरोधात एकनाथ खडसे म्हणाले. 'एका सेवा निवृत्त शिक्षकाच्या मुलाच्या कडे एवढी संपत्ती कशी? मंत्री गिरीश महाजन यांचा व्यवसाय आहे तरी काय?', असा सवाल देखील खडसे यांनी उपस्थित केले. 

हेही वाचा: 'दबावामुळेच तपास अधिकाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं'; असिफ खानचा खळबळजनक दावा

पुरावे जप्त करण्यासाठी लोढांना अडकवले 

'प्रफुल लोढा यांच्याकडे हनी ट्रॅप प्रकरणात काही महत्वाची माहिती आणि पुरावे आहेत. ते त्यांच्याकडून जप्त करता यावे किंवा ती माहिती आणि पुरावे इतरांना मिळू नये, यासाठी लोढांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे', असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.


सम्बन्धित सामग्री