मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाला एका दिवसाने मागे टाकले आणि सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले दुसरे पंतप्रधान बनले. 25 जुलै 2025 रोजी, मोदींनी पंतप्रधानपदाचे 4,078 दिवस पूर्ण केले. 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 पर्यंत इंदिरा गांधी यांचा सलग 4,077 दिवस पंतप्रधान म्हणून विक्रम मागे टाकला आहे.
जवाहरलाल नेहरूंनंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा इंदिरा गांधींचा विक्रम मागे टाकण्याव्यतिरिक्त, मोदींना अनेक ऐतिहासिक सन्मान देखील आहेत. ते स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले आणि एकमेव पंतप्रधान आहेत. सर्वात जास्त काळ बिगर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत आणि हिंदी भाषिक नसलेल्या राज्यातील सर्वात जास्त काळ असणारे पंतप्रधान आहेत.
हेही वाचा: महायुतीमध्ये होणार मोठे फेरबदल; कुठल्या आठ मंत्र्यांना मंत्रिपदाला मुकावं लागणार?
सलग दोन टर्म पूर्ण करणारे आणि बहुमताने दोनदा पुन्हा निवडून आलेले ते पहिले आणि एकमेव बिगर-काँग्रेसी नेते आहेत. ज्यामुळे लोकसभेत स्वतःच्या बळावर बहुमत मिळवणारे ते एकमेव बिगर-काँग्रेसी नेते बनले आहेत. 1971 मध्ये इंदिरा गांधींनंतर पूर्ण बहुमताने सत्तेत येणारे मोदी हे पहिलेचं विद्यमान पंतप्रधान आहेत.
नेहरूंव्यतिरिक्त, मोदी हे पक्षाचे नेते म्हणून सलग तीन निवडणुका जिंकणारे एकमेव पंतप्रधान आहेत. देशातील सर्व पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये, पक्षाचे नेते म्हणून सलग सहा निवडणुका जिंकणारे ते एकमेव आहेत. त्यांनी गुजरातमध्ये 2002 साली पहिल्यांदा निवडणूक जिंकली. त्यानंतर 2007 आणि 2012 साली गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्या. 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक जिंकली. वाराणसी येथून भारताच्या पंतप्रधानपदाची सुरुवात केली. यानंतर 2019 आणि 2024 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आले.