“हवेत बाण मारू नका…” महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच; नवनाथ बन यांच्या टीकेवर राणेंचं प्रत्युत्तर

भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेवर बोलताना शिवसेना एकनाथ शिंदे गटावर केलेल्या टीकेवर आता निलेश राणे यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे.

“हवेत बाण मारू नका…” महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच; नवनाथ बन यांच्या टीकेवर राणेंचं प्रत्युत्तर
Maharashtra Politics

विधान परिषद निवडणुकीत विधान परिषदेच्या पाच जागांपैकी 3 जागा मविआने तर दोन जागा महायुतीने जिंकल्या आहेत. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर लागलेल्या निकालामुळा महायुतीत वादाची ठिणकी पडली आहे. या निकालानंतर विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने समन्वय ठेवला असता तर दोन जागा अधिक जिंकता आल्या असत्या असा आरोप भाजपने केला. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या वक्तव्याचा आधार घेत भाजप नेत्यांकडून टीका होत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेवर बोलताना शिवसेना एकनाथ शिंदे गटावर देखील टीकेचे शिंतोडे उडवले आहेत.

नवनाथ बन यांनी केलेल्या टीकेवर आता शिंदे गटातील नेते निलेश राणे यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी निलेश राणे म्हणाले की “आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. नवनाथ बनला वाटत असेल सहकार्य झाल नाही तर कुठे झालं नाही ते दाखवाव. हवेत बाण मारू नका.. एका मुळे तुम्ही पक्षाला जबाबदार ठरवू शकत नाही. सर्वांनी महायुती म्हणूनच काम केलं आहे.”

हेही वाचा- सत्ताधारी-विरोधकांनी हलक्यात घेतलं, मात्र अपक्ष उमेदवाराने अख्खा गेम फिरवला; आता नितेश कराळे विधानसभा लढवणार

राज ठाकरेंवर बोलताना नीलेश राणे म्हणाले की, “राज साहेब आणि त्यांची भूमिका रोज बदलत असते. शासन म्हणून आम्ही नेहमी वृक्ष लागवड करत असतो. त्याचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी सरकार बरोबर बसाव. आम्ही भीमाशंकर प्रकल्प राबविणारच अस म्हणत नाही. आम्ही करणारच अशी सरकारची भूमिका नाही. राज साहेबांना काही गैरसमज असेल तर सरकार सोबत बसावं राजकारणी नको असतील तर सेक्रेटरी, ऑफिसर बरोबर बसाव राजकारासाठी राजकारण करू नका.”

नवनाथ बन काय म्हणाले?
“शिवसेनेने सचिन सानप ला ऐनवेळी पाठिंबा घोषित केला. ऐनवेळी शिवसेनेमुळे परिणाम झाला. शिक्षक मतदारसंघात 16 हजार मते सानप यांना मिळाली. 10 ते 12 हजार मतांनी पदवीधर मध्ये भाजपचा पराभव झाला. शिक्षक हे पदवीधर मध्ये ही मतदान करतात. ती मते ट्रान्सफर झाली असती तर स्मिता जाधव यांचा पहिल्याच फेरीत विजय झाला असता. संभाजीनगर मध्ये ही सतिश चव्हाण यांच्या विरुद्ध अब्दुल सत्तार यांनी उघड विरोधी भूमिका घेतली. तर पुण्यात रविंद्र धंगेकर यांनी जाहीर विरोधात आवाहन केले. धंगेकर यांचे आवाहनाचे पोस्ट मी दाखवत आहे. शिवसेना महानगर प्रमुख पदवीधर निवडणुकीत मतदारांना आवाहन करतात. स्मिता जाधव यांना मतदान करू नका. केसाने गळा कापला असेल तर धंगेकरांवर कारवाई केली पाहिजे.”

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number