Saturday, August 16, 2025 08:32:40 PM

ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरुन? पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत थेट बोलले

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नाही'.

ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत थेट बोलले

नवी दिल्ली: सोमवारपासून लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत भारताने अचानक मान्य केलेल्या युद्धविरामाचा निर्णय केंद्रस्थानी राहिला होता. यासह, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून भारताने युद्धविरामाचा निर्णय घेतला का?', हा प्रश्न विरोधी पक्षांकडून विचारला जात होता. यावर, ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. 'जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नाही', असं प्रत्युत्तर पंतप्रधान मोदींनीं दिले.

हेही वाचा: नांदणीची 'महादेवी' हत्तीण अंबानींच्या 'वनतारा'कडे रवाना; गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नाही'. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स यांनी 9 मे रोजी रात्री माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. पण, तेव्हा लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत माझी बैठक सुरू होती. यामुळे, मला त्यांचा फोन उचलता आला नाही. बैठक झाल्यानंतर, जेव्हा मी त्यांना फोन केला, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, 'पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे'. तेव्हा मी त्यांना सांगितले की, 'पाकिस्तानने अशी आगळीक केली तर ती त्यांना खूप महागात पडेल. जर पाकिस्तानने हल्ला केला तर आम्ही त्यांच्यावर त्यापेक्षा मोठा हल्ला करू. गोळीचं उत्तर हे गोळ्याने दिलं जाईल'.


सम्बन्धित सामग्री