मुंबई: राज्यात हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा होत आहे. अशातच, हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल लोढा यांचे नाव घेतले जात असून आतापर्यंत त्यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. एकीकडे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दावा केला होता की, 'ही व्यक्ती गिरीश महाजन यांच्या खूप जवळची व्यक्ती आहे'. तर दुसरीकडे, गिरीश महाजन यांनी खडसेंचे सगळे दावे फेटाळून लावले होते. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रफुल लोढा यांचा मुलगा पवन लोढा यांनी दावा केला आहे की, 'एकनाथ खडसेंनी असा दावा केला आहे की, 'एकनाथ खडसेंनी माझ्या वडिलांना अडकवलंय'.
हेही वाचा: कंत्राटदार की अभियंता? हर्षल पाटलाच्या मृत्यूनंतर गुलाबराव पाटलांचा मोठा दावा
'माझ्या वडिलांना अडकवण्यासाठी खडसे जबाबदार' - पवन लोढा
पवन लोढा म्हणाले की, 'प्रफुल लोढा यांच्याविरोधात जे गुन्हे दाखल झाले आहे, ते अत्यंत खोटे आहेत. त्यांना एकनाथ खडसेंनी माझ्या वडिलांना अडकवलंय. मुंबईत माझ्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो आणि आमच्या जामनेरच्या घरी चौकशी होते. यासह, पहूरच्या व्यापारी संकुलातही चौकशी होते. ही चौकशी करण्याचं आणि छापा टाकण्याचा कुठलं कारणच नाही. पोलीस जे पेन ड्राईव्ह घेऊन गेले, जे सीडी घेऊन गेले ते सर्व साहित्य माझ्या कामाचे आहे. मी महावितरण कंपनीचे काम करतो. ते पेन ड्राईव्ह आणि सीडी घेऊन गेले ते सर्व साहित्य माझ्या त्याच कामाचे होते'.
पुढे, पवन लोढा यांनी एक विधान केले की, 'मागील कालात सुद्धा बीएचआरच्या पतसंस्थेच्या माध्यमातून आमच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. त्यावेळीसुद्धा गिरीश महाजन यांच्या संदर्भातील सीडी वगैरे काही मिळते का? ते तपासण्यासाठीच आमच्याकडे छापे टाकण्यात आले होते. जिल्ह्यात गिरीश महाजन यांच्यापेक्षा मोठा नेता कोणी नसल्याने एकनाथ खडसे मुद्दामच हा मुद्दा उचलत आहेत'.