मुंबई: मराठी भाषा आणि मराठी अस्मिता या मुद्द्यांवर मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चाची हाक दिली आहे. आज सकाळी बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र त्या आधीच पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. तसेच मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र काही झालं तरी मोर्चा निघणारच अशी भूमिका मनसेने घेतली आहे. यामुळे मोर्चाआधी मिरा-भाईंदरमधील वातावरण तापलं आहे.
पोलिसांकडून सर्व मनसे नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मनसैनिकांना मीरा-भाईंदरमध्ये न येण्यासाठी नोटीस बजावलं आहे. तर राज ठाकरेंच्या पुढील आदेशावर मनसैनिक दिशा ठरवणार आहेत. सध्या मनसेच्या मोर्चाआधी मिरा-भाईंदरमधील वातावरण तापलं असून पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. मीरा रोड परिसरात पोलिसांकडून जमावबंदी करण्यात आली आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदरमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरु आहे. मनसे नेते संतोष धुरी मिरा-भाईंदरमध्ये पोहोचले आहेत.
हेही वाचा: Diva: आईकडून पोटच्या मुलीला अमानुष मारहाण
मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात
मराठीच्या मुद्द्यावर आज मिरा- भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र या मोर्चाआधीच पोलिसांनी मनसैनिकांना नोटीसा बजावल्या आहेत. तसेच मनसे नेते अविनाश जाधव यांना पहाटे 3 वा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काहीही झालं तरी मोर्चा निघणारच असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे.
मिरा- भाईंदरमधील वातावरण तापलं
दरम्यान मिरा- भाईंदरमधील मोर्चाआधीच तेथील वातावरण तापलं असून पोलिस आणि मनसैनिकांमध्ये धरपकड सुरु आहे. पोलिसांकडून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून मोर्चाआधी मनसे नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मनसे नेते राजू पाटलांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांकडून नोटीसा देण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून मिरा-भाईंदरमध्ये न येण्यासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
मनसे नेते राजू पाटलांनाही नोटीस
मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना पोलीस उपायुक्त मिरा भाईदर परीमंडळ 1 अंतर्गत जमावबंदी कायद्यान्वये नोटीस देण्यात आली आहे. सदर नोटीस मिरा भाईंदर येथे एका व्यापाऱ्याला मराठी हिंदी वादाअंतर्गत कानशिलात लगावल्याने दिली आहे. विशेष म्हणजे डोंबिवलीतील मानपाडा अंतर्गत रात्री अडीच वाजता ही नोटीस देण्यात आली. राजू पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानणारे ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय कि मिरा भाईदर, वसई विरार यांच्याकडून नोटीस मिळाली. अतिरेकी संबोधणाऱ्या आशिष शेलार व महाराष्ट्र राज्य सरकारचे आभार मानले आहे.