Saturday, August 16, 2025 07:14:23 AM

ये रिश्ता क्या कहलाता है?, महाजनांकडून लोढा आणि खडसेंचा फोटो पोस्ट

मंत्री गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांचा एक फोटो समाज माध्यमात टाकला आहे. या फोटोमध्ये लोढा आणि खडसे यांच्यामध्ये गुफ्तगु सुरु आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है महाजनांकडून लोढा आणि खडसेंचा फोटो पोस्ट

मुंबई: मंत्री गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांचा एक फोटो समाज माध्यमात टाकला आहे. या फोटोमध्ये लोढा आणि खडसे यांच्यामध्ये गुफ्तगु सुरु आहे. महाजनांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चांणा उधाण आले आहे. राज्यात सध्या हनी ट्रॅप्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल्ल लोढा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यात लोढाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच हनी ट्रॅप प्रकरणात नाशिकमधील 72 नेते आणि अधिकारी अडकल्याची चर्चा आहे. अशातच महाजनांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे नव्या प्रकरणाला तोंड फुटले आहे. 

काय म्हणाले गिरीश महाजन? 
एकनाथ खडसे... तुमच्या या "गुलाबी गप्पा" कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय. हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात ?, हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे. 

हेही वाचा: अल कायदाचे चार अतिरेकी अटकेत; गुजरात पोलिसांची धडक कारवाई

2019 ते 2022च्या दरम्यान अश्या खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच... आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय?  एकनाथ खडसे… काय तुझी हि व्यथा...! अशा आशयाची पोस्ट मंत्री गिरीश महाजन यांनी पोस्ट केली आहे. 

मंत्री गिरीश महाजन यांनी लोढासोबतचा फोटो पोस्ट करुन एकनाथ खडसे यांना सुनावले आहे. लोढा हा पूर्वी भाजपाचा पदाधिकारी होता. महाजनांवर त्याने गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. म्हणजेच काय तर प्रफुल्ल लोढाला राजकीय पार्श्वभूमी आहे. महाजनांनी व्हायरल केलेल्या फोटोनंतर लोढा आणि खडसे यांचे काय संबंध आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरम्यान माझ्या वडिलांना अडकवण्याचे षड्यंत्र आहे असा खळबळजनक दावा प्रफुल्ल लोढाच्या मुलाने केला आहे. वडिलांना अडकवण्यासाठी खडसे जबाबदार आहेत असेही लोढाच्या मुलाने म्हटले आहे. मात्र हे आरोप एकनाथ खडसे यांनी फेटाळले आहेत. 


सम्बन्धित सामग्री