Saturday, August 16, 2025 12:18:16 PM

Mars Transit: अखेर 'या' राशींची मंगळ-केतू युतीतून सुटका, आता होणार सुख-समृद्धीचा वर्षाव; जाणून घ्या

श्रावणातील पहिल्या सोमवारी मंगळ-केतू युती तुटली. 4 राशींसाठी हा बदल अत्यंत शुभ. करिअर, आरोग्य, संपत्ती आणि मानसिक शांती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे

mars transit अखेर या राशींची मंगळ-केतू युतीतून सुटका आता होणार सुख-समृद्धीचा वर्षाव जाणून घ्या

Mars Transit: श्रावण महिन्याचा पवित्र पहिला सोमवार आणि त्याच दिवशी मंगळ ग्रहाचं संक्रमण; हा दुर्मिळ संयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आज 28 जुलै रोजी मंगळाने सिंह राशी सोडून कन्या राशीत प्रवेश केला आणि त्यासोबतच मंगळ व केतू यांच्यातील अपकारक युतीचा अखेर शेवट झाला. यामुळे चार राशींना विशेष दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून मंगळ-केतूची युती सिंह राशीत होतं. युती अशुभ समजली जाते कारण यामुळे आक्रमकता, अपघात, आरोग्य समस्या, आणि आर्थिक अडचणी निर्माण होण्याचा धोका वाढतो. परंतु आज झालेल्या ग्रहबदलामुळे हे सारे संकट निवळण्याच्या मार्गावर आहे.

विशेष म्हणजे आजचा दिवस श्रावण महिन्यातील पहिला सोमवारही आहे. या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. त्यामुळे या ग्रहबदलाकडे भक्त आणि ज्योतिष अभ्यासक एका दैवी चमत्कारासारखे पाहत आहेत.

कोणत्या राशींना होणार फायदा?

मेष राशी:
मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे हे संक्रमण अत्यंत फलदायी ठरेल. करिअरमध्ये मोठ्या संधी चालून येतील. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जुने आजार दूर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अभ्यासासाठी अनुकूल आहे.

कर्क राशी:
कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुने अडथळे दूर होतील. विशेषतः व्यावसायिक लोकांचे थांबलेले व्यवहार आता मार्गी लागतील. नवीन नोकरीचे प्रस्ताव किंवा इच्छित स्थळी बदलीची शक्यता आहे.

वृश्चिक राशी:
वृश्चिक राशीवर मंगळाचा विशेष प्रभाव असल्याने आता तुम्हाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. खर्चावर नियंत्रण राहिल्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल. घरातील वाद शांत होतील. मालमत्तेशी संबंधित निर्णय घ्यावयाचा असल्यास ही वेळ अनुकूल ठरू शकते.

धनु राशी:
शनीच्या ढैय्यात सापडलेली ही रास आता थोडीफार विश्रांती अनुभवेल. मंगळाचे संक्रमण पूर्वीच्या समस्यांपासून दिलासा देईल. करिअर, नोकरी आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल होईल. अचानक धनलाभ किंवा जुनी थकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहस्थितीतील बदल हे आपल्यावर परिणाम करतात. आज मंगळाने केलेले संक्रमण हे केवळ ज्योतिषदृष्ट्या नाही, तर अध्यात्मिकदृष्ट्याही महत्त्वाचं मानलं जात आहे. विशेषतः जेव्हा श्रावण सोमवारी हे घडतं, तेव्हा याचा शुभ परिणाम अधिकच वाढतो.

आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की, या चार राशी या संधीचा लाभ किती घेतात आणि पुढील काळात त्यांच्या जीवनात किती सकारात्मक बदल होतो.

(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.) 


सम्बन्धित सामग्री