Sunday, August 17, 2025 04:09:37 PM

कॅनडामध्ये मोठा अपघात! लँडिंग करताना Delta Airlines चे विमान Toronoto Airport वर कोसळले; 19 प्रवासी जखमी

टोरंटोच्या पिअर्सन विमानतळाने सांगितले की, अपघातग्रस्त विमानात 76 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. डेल्टा एअर लाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, हा अपघात सोमवारी दुपारी 3:30 वाजता झाला.

कॅनडामध्ये मोठा अपघात लँडिंग करताना delta airlines चे विमान toronoto airport वर कोसळले 19 प्रवासी जखमी
Delta Airlines Plane Crash
Edited Image/Twitter

Delta Airlines Plane Crash: कॅनडाची राजधानी टोरंटोमध्ये सोमवारी एक मोठा अपघात झाला. टोरंटोच्या पिअर्सन विमानतळावर लँडिंग करताना डेल्टा एअर लाइन्सचे विमान बर्फाळ जमिनीवर उलटले. या अपघातात 19 जण जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. विमानतळ प्राधिकरणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची पुष्टी केली आहे. टोरंटोच्या पिअर्सन विमानतळाने सांगितले की, अपघातग्रस्त विमानात 76 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. डेल्टा एअर लाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, हा अपघात सोमवारी दुपारी 3:30 वाजता झाला.

घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये मित्सुबिशी CRJ-900LR विमान बर्फाळ डांबरी रस्त्यावर उलटे पडलेले दिसत होते. आपघातानंतर आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी त्यावर पाणी ओतले. अलीकडेच टोरंटोमध्ये बर्फाचे वादळ आले. याच कारणामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा - पंतप्रधान मोदी भारतात परतताच एलोन मस्क यांनी घेतला मोठा निर्णय; लाखो डॉलर्सचा निधी थांबवला

ऑरंज एअर अॅम्ब्युलन्सने सांगितले की, एका मुलाला टोरंटोमधील सिककिड्स रुग्णालयात विमानाने नेण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या दोन प्रौढ प्रवाशांना शहरातील इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. विमानतळाने सोशल प्लॅटफॉर्म एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपत्कालीन पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. 

हेही वाचा - आयात शुल्क 50 टक्के कमी करण्यात आलेली बोर्बन व्हिस्की संदर्भातील 'हे' रोचक तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?

दरम्यान, कॅनडाच्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अपघात झाला त्यावेळी विमानतळावर बर्फवृष्टी होत होती. वाऱ्याचा वेग ताशी 51 किलोमीटर ते 65 किलोमीटर होता. तापमान उणे 8.6 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. तथापी, हा अपघात खूपचं दुर्मिळ असल्याचं फ्लोरिडामधील सेंट पीटर्सबर्ग येथील विमान वाहतूक सुरक्षा सल्लागार कंपनी सेफ्टी ऑपरेटिंग सिस्टम्सचे सीईओ जॉन कॉक्स यांनी म्हटलं आहे. 
 


सम्बन्धित सामग्री