Wednesday, May 22, 2024 12:37:04 AM

मुंबईचं ठरलं, ठाण्याचं काय ?

मुंबईचं ठरलं ठाण्याचं काय

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील जागांवरुन महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळते. त्यातच, मुंबईतील हायप्रोफाईल मतदारसंघ असेलल्या दक्षिण मुंबईतील जागेवर भाजपाकडून तयारी सुरू करण्यात आली होती. भाजपा नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र, अखेर येथील जागेवर शिवसेनेनं आपला धनुष्यबाण चालवल्याचे दिसून येते. दक्षिण मुंबईतून महायुतीकडून कोण उमेदवार असणार याचा तिढा आता सुटला आहे. दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याच निमित्ताने आता मुंबईतील सर्व जागांवर महायुतेचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे.

https://youtu.be/K6TmPvZ6ocU

महायुतीमध्ये मुंबईतील दोन जागांचा पेच कायम होता त्यानंतर मंगळवारी सकाळी वायव्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवाराची घोषणा केली लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यांचा सामना महाविकास आघाडीचे शिउबाठाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याशी होणार आहे. त्यानंतर मंगळवारीच संध्याकाळच्या सुमारास शिवसेनेने परिपत्रक जरी करत दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर आता मुंबईतील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार घोषित झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीचं पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी होत असून, उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात देखील झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात आणि नाशिकमध्ये उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. उबाठा गटाकडून अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजन विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. तर, दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईतून महायुतीकडून राहुल शेवाळे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना उबाठा गट आणि शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. महायुतीकडून मुंबईतील सर्व जागांवर उमेदवार घोषित करण्यात आला आले असले तरीही ठाण्यात अद्याप उमेदवार कोण हे ठरताना दिसत नाही आहे. नुसतं ठाणेच नाही तर नाशिक ठाणे पालघर आणि कल्याण मतदारसंघात सुद्धा श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणाकरण्यात आलेली नाही.

मुंबईत अशी होणार लढत -

उत्तर मुंबई – पीयूष गोयल, भाजपा विरुद्ध भूषण पाटील, काँग्रेस विरुद्ध बीना सिंह, वंचित
उत्तर मध्य मुंबई – अॅडव्होकेट उज्ज्वल निकम, भाजपा विरुद्ध वर्षा गायकवाड, काँग्रेस
दक्षिण मुंबई – यामिनी जाधव, शिवसेना विरुद्ध अरविंद सावंत, शिउबाठा
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे, शिवसेना विरुद्ध अनिल देसाई, शिउबाठा विरुद्ध अबुल खान, वंचित
वायव्य मुंबई – रवींद्र वायकर, शिवसेना विरुद्ध अमोल कीर्तीकर, शिउबाठा विरुद्ध संजीव काळकोरी, वंचित
ईशान्य मुंबई – मिहीर कोटेचा, भाजपा विरुद्ध संजय दीना पाटील, शिउबाठा

चार मतदारसंघ असे आहेत ज्यांचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.

ठाणे लोकसभा मतदारसंघ – विद्यमान खासदार शिउबाठाचा (राजन विचारे) – शिवसेनेचा उमेदवार ठरेना (संभाव्य – प्रताप सरनाईक)
कल्याण लोकसभा मतदारसंघ – विद्यमान खासदार शिवसेनेचा (डॉ. श्रीकांत शिंदे) – शिवसेनेचा उमेदवार अधिकृतरित्या जाहीर होईना (संभाव्य – डॉ. श्रीकांत शिंदे)
पालघर लोकसभा मतदारसंघ – विद्यमान खासदार भाजपाचा (राजेंद्र गावित) – महायुतीचा उमेदवार ठरेना (संभाव्य – राजेंद्र गावित)
नाशिक लोकसभा मतदारसंघ – विद्यमान खासदार शिवसेनेचा (हेमंत गोडसे) – महायुतीचा उमेदवार ठरेना (संभाव्य – हेमंत गोडसे, छगन भुजबळ)

     

सम्बन्धित सामग्री