प्रदीप पूर्णेकरप्रकरणी राजेंद्र शिंदेंची तब्बल 9 तास चौकशी; संबंधित आरोपांवर नेमकं काय म्हणाले?

प्रदीप पूर्णेकर गोळीबार हत्या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर आणि नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे उर्फ राजा शिंदे यांची तब्बल 9 तास चौकशी केली.

प्रदीप पूर्णेकरप्रकरणी राजेंद्र शिंदेंची तब्बल 9 तास चौकशी; संबंधित आरोपांवर नेमकं काय म्हणाले?
Pradeep Purnekar Murder Case

प्रदीप पूर्णेकर यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला होता. हे कारस्थान निवडणुकीआधीपासूनच रचले गेले होते आणि यापूर्वीही पूर्णेकर यांना मारण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा कुटुंबीयांनी पुराव्यांसह पत्रकार परिषदेत केला होता.

मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान प्रदीप पूर्णेकर गोळीबार हत्या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर आणि नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे उर्फ राजा शिंदे यांची तब्बल 9 तास चौकशी केली. तसेच त्यांना उद्या पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ठाणे शहर सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यावेळी खंडणी विरोधी पथकात राजेंद्र शिंदे यांची चौकशी करून सोडून दिले.

हेही वाचा- ‘निखिल खडसेंनी काय पाहिलं होतं?’ चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ! खडसेंचं थेट आव्हान म्हणाले; राजकारण तापलं

विशेष म्हणजे पूर्णेकर हत्या प्रकरणातील अटक असलेल्या 5 आरोपींची आणि राजेंद्र शिंदे यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. पप्या शिंदे, निखिल यादव, नितेश पवार आणि प्रयागराज मधून अटक केलेल्या संतोष कनोजिया उर्फ टल्ली, अमित सिंग उर्फ पपलू या पाचही जणांची राजेंद्र शिंदे यांच्या समवेत समोरासमोर चौकशी करण्यात आली. राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीनंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजेंद्र शिंदे प्रतिक्रिया देत म्हणाले, “आज चौकशी झाली आहे … चौकशी सुरू आहे…चौकशीनंतर सांगणार मी… पोलिसाना सहकार्य करणार… आरोपांवरील प्रश्न विचारताच राजेंद्र शिंदेंनी मौन बाळगले..” प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. राजेंद्र शिंदे यांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर, पाहा जय महाराष्ट्र न्यूज

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number