शनिवारी, 22 मार्च 2025 रोजी, कर्नाटकमध्ये कन्नड समर्थक संघटना म्हणजेच कन्नड ओक्कुटा यांनी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. ज्यामुळे, सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवासी, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांच्या वाहतूक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील, कन्नड ओक्कुटा नावाच्या विविध कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी कर्नाटक बंदचे आयोजन केले होते. बेळगावी येथे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) बस कंडक्टरने मराठीत न बोलल्यामुळे हल्ला करणाऱ्या मराठी समर्थक कार्यकर्त्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कन्नड समर्थक संघटनांनी केली आहे.
'या' आहेत आयोजकांच्या मागण्या:
मराठी गटांवर बंदी: कर्नाटकातील महाराष्ट्र एकीकरण समिती (MES) सारख्या मराठी गटांवर बंदी घालण्याची मागणी आयोजक करत आहेत.
कन्नड भाषिक लोकसंख्येचे संरक्षण: आयोजक, कन्नड भाषिक लोकसंख्येच्या संरक्षणाची मागणी करत आहेत. खासकरून, जे बेळगावसारख्या सीमावर्ती भागांमध्ये राहत आहेत.
बेंगळुरू विभागाला विरोध: आयोजक, बंगळुरूच्या अनेक झोनमध्ये विभाजन करण्यासाठीही आयोजक विरोध करत आहेत. आयोजकांच्या मते, विभाजन केल्यास कन्नड संस्कृती कमकुवत होऊ शकते अशी भीती आयोजकांना वाटत आहे.
'हे' आहेत कर्नाटक बंदची प्रमुख कारणे:
केएसआरटीसी (KSRTC) बस कंडक्टरवर झालेला हल्ला: बेळगावमध्ये कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बस कंडक्टरने मराठीत न बोलल्यामुळे मराठी समर्थकांनी हल्ला केला होता. याच्या निषेधार्थ, संपूर्ण राज्यभरात कर्नाटक बंद घोषित करण्यात आले. कंडक्टर मराठी भाषिक नसल्यामुळे झालेल्या हल्ल्यामुळे, राज्यात भाषिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला.
सीमा वाद आणि भाषिक तणाव: या तणावांचे मुख्य कारण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वर्षानुवर्षे चालणारा सीमा वाद कारणीभूत आहे. 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती तेव्हा महाराष्ट्राने बेळगाव, कारवार आणि निप्पाणी यासारख्या गावांची मागणी केली होती. मात्र, कर्नाटकाने वारंवार नकार दिला. ज्यामुळे, हा सीमावाद थांबायचे नाव घेईना.
बृहत्तर बेंगळुरू गव्हर्नन्स विधेयकाला विरोध: कर्नाटक बंद असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, बृहत्तर बेंगळुरू गव्हर्नन्स विधेयकाला विरोध. ज्यामध्ये, ज्यामध्ये बंगळुरूला अनेक प्रशासकीय झोनमध्ये विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. कन्नड समर्थक संघटनांना अशी चिंता आहे की, यामुळे कन्नड संस्कृती आणि शहरातील उपस्थिती कमकुवत होणार.
कर्नाटक बंद दरम्यान, कोणत्या सेवा सुरु राहतील आणि बंद राहतील?
सार्वजनिक वाहतूक: बीएमटीसी आणि केएसआरटीसी बस सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर काही बस रस्त्यावरून जाऊ शकतात. बंदला पाठिंबा देण्यासाठी संघटनांनी हातमिळवणी केल्याने ओला आणि उबर यासारख्या खाजगी-टॅक्सी सेवा, ऑटो-रिक्षा, मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
शाळा आणि महाविद्यालये: खबरदारीचा उपाय म्हणून, खासकरून बेंगळुरूमध्ये, अनेक शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे.
मॉल्स आणि थिएटर: निषेध वाढल्यास काही मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि मनोरंजन केंद्रे बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.