अमेरिका : अमेरिकेत मोठा अपघात झाला आहे. प्रवासी विमान लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकले आहे. यामुळे वॉशिंग्टन विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. विमानात 64 प्रवासी होते तर हेलिकॉप्टरमध्ये 3 सैनिक होते. या अपघातातील 19 मृतदेह बाहेर काढले आहेत. तसेच 4 जणांना वाटवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बुधवारी रात्री अमेरिकेच्या पीएसए एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान रेगन वॉशिंग्टन विमानतळाजवळ अमेरिकन आर्मीच्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरला धडकले. ही दोन्ही विमानं विमानतळाच्या सीमेवरील पोटोमॅक नदीत कोसळली. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसजवळ हा अपघात झाला. हे विमान कॅन्सस सिटीहून वॉशिंग्टनला जात होते. लँडिंग दरम्यान ते एका हेलिकॉप्टरला आदळले आणि कोसळले. अमेरिकन एअरलाइन्सने पुष्टी केली की विमानात 60 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. तर ब्लॅकहॉक सिकोर्स्की एच-60 नावाच्या या हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते. आतापर्यंत एकूण 19 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 4 जणांना वाचवण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, या अपघातानंतर वॉशिंग्टनमधली अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
हेही वाचा : अहमदनगर नामांतराचा मुद्दा खंडपीठात; केंद्र आणि राज्य सरकारसह आयुक्तांना नोटिसा
वॉशिंग्टन डीसीच्या बाहेर लष्करी हेलिकॉप्टरला धडकल्यानंतर 64 जणांना घेऊन जाणारे विमान पोटोमॅक नदीत कोसळले. बुधवारी स्थानिक वेळेनुसार 9 वाजता (02:00 GMT) विचिटा, कॅन्सस येथून अमेरिकन एअरलाइन्सचे विमान रोनाल्ड रेगन राष्ट्रीय विमानतळाजवळ येत असताना ही टक्कर झाली.
हेही वाचा : सुखानं खाऊ दिलं नाही तर...; जरांगेंचा सरकारला इशारा
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केलेली नाही, परंतु पोलिसांना सांगितले की, आतापर्यंत 19 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यापैकी कोणीही वाचलेले नाही. एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, जेटला धडकलेल्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमध्ये तीन अमेरिकन सैनिक होते.