Sunday, August 17, 2025 01:50:37 PM

नागपुरात क्यूआर कोडमधून देणगीचा गोलमाल; टोळीचा एटीएस कर्मचाऱ्याकडून पर्दाफाश

नागपुरात क्यूआर कोडद्वारे देणगीचा गोलमाल समोर आला आहे. धार्मिक संस्थेच्या नावाखाली पैसे लुटणाऱ्या टोळीचा एटीएस कर्मचाऱ्याकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.

नागपुरात क्यूआर कोडमधून देणगीचा गोलमाल टोळीचा एटीएस कर्मचाऱ्याकडून पर्दाफाश

नागपूर : नागपुरात क्यूआर कोडद्वारे देणगीचा गोलमाल समोर आला आहे. धार्मिक संस्थेच्या नावाखाली पैसे खाजगी खात्यात वळवले जात होते. धार्मिक संस्थेच्या नावाखाली पैसे लुटणाऱ्या टोळीचा एटीएस कर्मचाऱ्याकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात मोहम्मह एजाज अन्सारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.   

नागपूर जिल्ह्यात धार्मिक स्थळांजवळ क्यूआर कोड लावून देणगी जमा करणाऱ्या एका रॅकेटचा एटीएसच्या कर्मचाऱ्याने भंडाफोड केला. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद एजाज अन्सारी असं आरोपीचे नाव आहे. आरोपी जेरे अहतमाम दारुल उलूम गौसिया इंजेजामिया या संस्थेचा सदस्य आहे. संबंधित संस्था नोंदणीकृत आहे. आरोपीने संस्थेच्या नावाने क्यूआर कोड बनविले होते व ते विविध ठिकाणी लावले होते. संबंधित बॅनरवर एका निर्माणाधीन इमारतीचे चित्रदेखील होते.  

हेही वाचा: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरला अपघात; लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड

धार्मिक संस्थेच्या नावाखाली खाजगी खात्यात पैसे वळवले जात होते. या कोडच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात देणगी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तपासात आरोपीच्या खात्यात वेगवेगळ्या ठिकाणांहून 65 लाखांहून अधिक रक्कम आली होती. या संदर्भात कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएसच्या नागपूर युनिटमधील नौशाद परवेज मोहम्मद अशपाक यांना शंका आली व त्यांनी 50 रुपये क्यूआर कोड स्कॅन करून पाठविले. संबंधित रक्कम ही संस्थेच्या खात्यावर जमा न होता स्टार कॉम्युटर सोल्युशन्सच्या खात्यावर जमा झाली. संबंधित कंपनी ही आरोपीचीच आहे असं कळाल्यामुळे प्रकरणाचा भांडाफोड झाला. हा गैरप्रकार समोर आल्यावर नौशाद यांनी कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अन्सारीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 314, 316 व 318 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या पैशांचा उपयोग देशविघातक कामासाठी होत होता का याचा तपास सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री