Sunday, April 20, 2025 06:10:32 AM

नागपुरात 28 वर्षीय तरुण उद्योजकावर चौघांकडून गोळीबार

नागपूरच्या धरमपेठ परिसरात घडलेल्या एका थरारक घटनेने शहर हादरून गेलं आहे. अविनाश भुसारी (वय 28) या तरुण उद्योजकाची चार अनोळखी व्यक्तींनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली.

नागपुरात  28 वर्षीय तरुण उद्योजकावर चौघांकडून गोळीबार

नागपूर: नागपूरच्या धरमपेठ परिसरात घडलेल्या एका थरारक घटनेने शहर हादरून गेलं आहे. अविनाश भुसारी (वय 28) या तरुण उद्योजकाची चार अनोळखी व्यक्तींनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. ‘सोशा रेस्टॉरंट’चा मालक अविनाश भुसारी हा मध्यरात्री आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता याचवेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी थेट गोळीबार करत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं.

गंभीर अवस्थेत भुसारीला  तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी अविनाशला तपासून मृत घोषित केल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेनंतर धरमपेठसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात अशा प्रकारचा थरार घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. 

घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्राथमिक माहिती गोळा केली असून, चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विविध अंगांनी तपास सुरू असून आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
 


सम्बन्धित सामग्री