२२ जुलै, २०२४ शिर्डी : कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मयत इसमाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे.
कोपरगाव शहरात २८ वर्षीय सोहेल हारून पटेल या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी, सहा आरोपींवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे तर, तिघेजण फरार आहेत. या घटनेमुळे कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोहेल याचे अपहरण करण्यात आले. यानंतर आरोपींकडून सोहेल याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सोहेल पटेल याचा मृत्यू झाला आहे.