मुलगा होईल म्हणून सांगितलं.. पण मुलगी झाली.. माथेफिरूंनी 75 वर्षीय पुजाऱ्याला गोळ्या झाडून संपवलं!

पोलिसांच्या कसून चौकशीदरम्यान हाशिम आणि झीशान यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तसेच, शेजाऱ्याला या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचेही मान्य केले.

मुलगा होईल म्हणून सांगितलं.. पण मुलगी झाली.. माथेफिरूंनी 75 वर्षीय पुजाऱ्याला गोळ्या झाडून संपवलं!
Crime

Muzaffarnagar Hindu Priest Murder Case: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलगा होईल असे केलेले भाकीत चुकीचे ठरल्याच्या रागातून 75 वर्षीय हिंदू पुजारी स्वामी देवानंद भारती यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी 54 वर्षीय हाशिम आणि त्याचा 22 वर्षीय मुलगा झीशान या दोघा पिता-पुत्रांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी त्याच गावातील रहिवासी असून मजुरीचे काम करतात. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

13 ऑक्टोबर रोजी मंदिराच्या खोलीबाहेर आढळला मृतदेह
स्वामी देवानंद भारती हे मुझफ्फरनगरमधील भौरा कलां गावातील शिवमंदिरात पुजारी म्हणून कार्यरत होते आणि मंदिराच्या परिसरातच राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी झीशानच्या पत्नीला यापूर्वी दोनदा गर्भपात झाल्यामुळे मूल होत नव्हते; त्यामुळे या दाम्पत्याने पुजारी भारती यांच्याशी संपर्क साधला होता. पुजाऱ्याने काही औषधोपचारही सुचवले होते, मात्र, सुमारे महिनाभरापूर्वी महिलेने मुलीला जन्म दिला. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पुजाऱ्याच्या खोलीबाहेर त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने एकच हाहाकार उडाला.

हेही वाचा – रत्नागिरीतील आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल; पोलिसांकडून तपास सुरू

हत्येनंतर शेजाऱ्याला अडवण्याचा होता डाव
पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत असे समोर आले की, हत्येनंतर आरोपींनी एका निर्दोष शेजाऱ्याला या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला होता. जुन्या वादाच्या कारणावरून हरेंद्र नावाच्या शेजाऱ्याला गोवण्यासाठी झीशानने त्याच्या मोबाईलमधील फोटोची प्रिंट स्टुडिओमधून काढून ती घटनास्थळी ठेवली होती. मात्र, पोलिसांनी जेव्हा फोटोची पडताळणी केली तेव्हा फोटो प्रिंट करणाऱ्या स्टुडिओच्या मालकाच्या चौकशीतून झीशानचे नाव समोर आले, ज्यामुळे हा संपूर्ण बनाव उघडा पडला आणि पोलिसांसमोर सत्य आले.

गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर शस्त्र व मोटारसायकल जप्त
पोलिसांच्या कसून चौकशीदरम्यान हाशिम आणि झीशान यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पुजाऱ्याने मुलगा होईल असे सांगितले होते, परंतु प्रत्यक्षात मुलगी जन्मल्यामुळे ते प्रचंड नाराज व संतापले होते, असे मुझफ्फरनगरचे सर्कल ऑफिसर नरेंद्र सिंह यादव यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरलेले गावठी पिस्तूल आणि मोटारसायकल जप्त केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

हेही वाचा – मामाने भाच्याला चॉकलेटऐवजी दिली लोडेड पिस्तूल; खेळताना अचानक गोळी सुटल्याने 3 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number