बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे देशमुखांचा बळी गेला असल्याचे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच पोलिसांनी सतर्कता दाखवली असती तर जीव वाचला असता का असा प्रश्नही निर्माण होत आहे. देशमुख प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला असा धक्कादायक जबाब फिर्यादी शिवराज देशमुख यांनी दिला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख फिर्यादी असलेल्या शिवराज देशमुख यांच्या जवाबातून धक्कादायक सत्यसमोर आले आहे. यातून पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. अपहरण झाल्यानंतर शिवराज देशमुख हे लगेच पोलीस स्टेशनला गेले होते. मात्र पोलिसांनी तीन ते साडेतीन तास दखल घेतली नाही. त्यावेळी पोलीस अधिकारी राजेश पाटील, प्रशांत महाजन महाजन आणि बनसोडे साहेब यांनी संपूर्ण हकीकतही पोलिसांना सांगितली. परंतु सदर पोलिसांनी मला तीन ते साडेतीन तास पोलीस स्टेशनला बसवले पोलीस कर्मचारी म्हणू लागले की फिर्याद दमानी (हळू) लिहावी लागते. तसेच कायदा बदललेला असल्यामुळे पुस्तक पाहून कलम लिहावे लागते असे म्हणत होते. त्यामुळे फिर्याद देण्याकरता बराच वेळ लागला.
हेही वाचा : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर; प्रत्यक्षदर्शीने A to Z सगळंच सांगितलं
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. आवादा कंपनीच्या खंडणीप्रकरणावरून देशमुख यांची हत्या करण्यात आली. याचबाबतीत आता मोठी माहिती हाती लागली आहे. आवादा कंपनीबाहेर टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब समोर आला आहे. आवादा कंपनीबाहेर एक चहाची चपरी आहे. तिथे चहा पिण्यासाठी आलेल्या प्रत्यक्षदर्शीने जबाब दिला आहे. 6 डिसेंबरला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी घुले साथीदारांसोबत कंपनीच्या गेटवर आला असे त्याने सांगितले आहे. त्यानंतर सुदर्शन घुलेनं साथीदारासोबत वॉचमनला शिवीगाळ केली. घुलेनं मारहाण करत कराडच्या नावानं 2 कोटींची खंडणी मागितल्याचा जबाब समोर आला आहे. मारहाणीदरम्यान सरपंच संतोष देशमुखा यांनी मध्यस्थी केली. "कंपनी बंद करू नका, गावातील लोकांना रोजगार मिळू द्या" अशी विनंती देशमुखांनी घुले आणि त्याच्या साथीदारांना दिली.