Friday, November 01, 2024 04:36:06 AM

कार्तिक आर्यनची झाली स्वप्नपूर्ती ; खरेदी केली ड्रीम कार

कार्तिक आर्यनची झाली स्वप्नपूर्ती  खरेदी केली ड्रीम कार

मुंबई , १५ मार्च २०२४, प्रतिनिधी": अभिनेता कार्तिक आर्यन हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार जो आपलूं अभिनयाने आणि वेगवेगळ्या हॅन्ड्सम अंदाजाने चाहत्यांच लक्ष वेधून घेताना दिसतो. कार्तिकला गाड्यांची आवड असल्याने त्याच्याकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन केले आहे. आता त्याच्या ह्या वेगवेगळ्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये आणखी एका आलिशान गाडीचं आगमन झालं आहे. त्यानं नुकतीच एक आलिशान गाडी खरेदी केली आहे तत्याच्या या ड्रीम कारचे फोटो प्रसार माध्यमावर शेअर केला आहे.

कार्तिकनं एक आलिशान कार खरेदी केली आहे. त्यानं Range Rover SV या नवीन गाडीचा त्याच्या कलेक्शनमध्ये समावेश केला असून कार्तिकनं त्याच्या या नव्या गाडीचा फोटो समाज माध्यमावर शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये कार्तिकसोबत 'कटोरी' हा त्याचा पेट दिसला. कार्तिकनं त्याच्या नव्या कारचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "हमारी रेंज थोड़ी सी बढ़ गई है।" कार्तिकने केलेल्या या पोस्ट वर नेटकऱ्यांनी भरगोस लाइक आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

खरेदी केलेल्या कारची किंमत :

त्याच्याकडे BMW 5 Series 520d, McLaren GT, Mini Cooper S, Lamborghini Urus Capsule आणि Porsche 718 Boxster यासह अनेक आलिशान कार आहेत परंतु नुकत्याच खरेदी केलेल्या कारची किंमत सहा कोटी आहे. .


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo