मुंबई: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे', असं म्हणत आपल्या भक्तांना पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी खंबीरपणे उभे असतात. महाराष्ट्रासह, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, यासारख्या विविध राज्यात स्वामींचे भक्त आहेत. सर्वसामान्यांप्रमाणेच सिनेसृष्टीतही श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनेक स्वामीभक्त आहेत. अशातच, बॉलिवूडमधील एका मराठमोळ्या अभिनेत्याने श्री स्वामी समर्थांच्या पादुका घरात आणून त्यांची मनोभावे पूजा केली असून यावर अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: क्रिकेटपटू शमीला उच्च न्यायालयाचा दणका; पत्नी आणि मुलीला दरमहा 4 लाख देण्याचे आदेश
कोण आहे 'हा' मराठमोळा बॉलिवूड अभिनेता?
'अजब प्रेम की गजब कहानी', 'जब वी मेट' यासारख्या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता शाम मशाळकरच्या घरी श्री समर्थांच्या पादुकांचं आगमन झालं आहे. स्वामींच्या पादुका घरी आणून भक्तिभावाने अभिनेता शाम आणि सप्त्नीक मनोभावे पूजा अर्चा करुन आदरातिथ्य केलं. हा भावनिक क्षण अभिनेता शामने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलं आहे. यासह त्याने एक व्हिडिओही त्याने शेअर केला आहे.
'आमच्या घरी काल तिन्हीसांजेच्या वेळी ''श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका गुरुमंदिर (श्री बाळप्पा मठ) अक्कलकोट'' यांचे पुजन झाल्याने प्रसन्न वाटले. स्वामींची कृपा', असं कॅप्शन शामने त्याच्या इंस्टा पोस्टला दिलं आहे. शामच्या इंस्टा पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बॉलिवूड अभिनेता शाम मशाळकरनं अनेक सुपरहिट मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'क्या लव्हस्टोरी है', 'पानीपत', 'हाऊसफुल 4', 'युवराज', 'अजब प्रेम की गजब कहानी' यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेत्यानं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.