Sunday, August 17, 2025 05:13:07 PM

CID निर्मात्यांनी केली ACP प्रद्युमन यांच्या मृत्यूची घोषणा, चाहत्यांमध्ये संतापाची लाट

‘CID’ मालिकेतील सर्वांत लोकप्रिय आणि प्रतिष्ठित पात्र ACP प्रद्युमन यांच्या निधनाची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केली आहे.

cid निर्मात्यांनी केली acp प्रद्युमन यांच्या मृत्यूची घोषणा चाहत्यांमध्ये संतापाची लाट

भारतीय टेलिव्हिजनवर तब्बल दोन दशकांहून अधिक काळ राज करणाऱ्या ‘CID’ मालिकेतील सर्वांत लोकप्रिय आणि प्रतिष्ठित पात्र – ACP प्रद्युमन – यांच्या निधनाची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केली आहे. हा निर्णय समजताच सोशल मीडियावर चाहत्यांनी भावनिक आणि संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरवाजा तोड दो म्हणणारा आवाज कायमचा बंद…

1998 पासून सुरू झालेली ‘CID’ मालिका ही भारतातील सर्वाधिक काळ चाललेली पोलिस तपासावर आधारित मालिका आहे. या मालिकेचा आत्मा म्हणजे ACP प्रद्युमन – त्यांचा बारकाईने पाहणारा कटाक्ष, सजग बुद्धी आणि ते खास डायलॉग्स प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले होते. 'दरवाजा तोड दो' हा त्यांचा डायलॉग आजही लोकांच्या ओठांवर आहे.

शेवटच्या एपिसोडमध्ये भीषण स्फोटात मृत्यू…

अलीकडे प्रसारित झालेल्या एका भागात ACP प्रद्युमन एका स्फोटात मृत्युमुखी पडतो, आणि त्यानंतर अफवा पसरू लागल्या की अभिनेता शिवाजी साटम आता ब्रेक घेणार आहेत. या चर्चांवर अखेर पूर्णविराम देत, Sony TV ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शनिवारी या पात्राच्या मृत्यूची घोषणा केली. या बातमीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांचा रोष ओसंडून वाहतो आहे. काहींनी तर सांगितलं की त्यांनी CID फक्त ACP प्रद्युमनसाठीच पाहत होते. अनेकांनी ‘CID’ पुन्हा सुरू करून ACP प्रद्युमनला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
 


सम्बन्धित सामग्री