Friday, April 25, 2025 09:41:27 PM

Gold Smuggling Case: 'मला कोठडीत मारहाण करण्यात आली, उपाशी ठेवण्यात आलं...', राण्या रावचा DRI वर गंभीर आरोप

अभिनेत्री रावने तिच्यावर खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. रान्या राव हिने दावा केला आहे की, तिचा कोठडीत छळ करण्यात आला.

gold smuggling case मला कोठडीत मारहाण करण्यात आली उपाशी ठेवण्यात आलं राण्या रावचा dri वर गंभीर आरोप
Ranya Rao
Edited Image

Gold Smuggling Case: कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने तुरुंगातून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (ADG DRI) अतिरिक्त पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. अभिनेत्री रावने तिच्यावर खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. रान्या राव हिने दावा केला आहे की, तिचा कोठडीत छळ करण्यात आला. तिला हाय-प्रोफाइल सोने तस्करी प्रकरणात खोटे गोवण्यात आले. 

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अतिरिक्त महासंचालकांना (एडीजी) लिहिलेल्या पत्रात अभिनेत्रीने आरोप केला आहे की, तिला थेट विमानातून अटक करण्यात आली. एजन्सीने अधिकृतपणे सांगितले आहे की तिला विमानतळ टर्मिनलवरून अटक करण्यात आली आहे, जे चुकीचे असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. तथापि, या पत्रात रान्या राव यांनी म्हटले आहे की, तिने सोन्याची तस्करी केलेली नाही. कोणतीही माहिती न देता तिला विमानातून बाहेर नेण्यात आले आणि नंतर या प्रकरणात गोवण्यात आले. यानंतर तिला मारहाण करण्यात आली. 40 हून अधिक टाईप केलेल्या आणि काही रिकाम्या पानांवर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेण्यात आल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. 

हेही वाचा - 14.8 किलो सोन्यासह विमानतळावर अटक झालेल्या रान्या रावचे वडील वडील रामचंद्र राव चर्चेत; याआधीही वादांमध्ये अडकले होते

अभिनेत्रीला कोठडीत मारहाण - 

मला कोठडीत मारहाण करण्यात आली, उपाशी ठेवण्यात आलं, असा आरोपही रान्या रावने केला आहे. पुढे राण्याने तिच्या पत्रात लिहिले आहे की, डीआरआय अधिकाऱ्याने धमकी दिली होती की, जर तिने या कागदपत्रांवर सही केली नाही तर तिच्या वडिलांचे नावही या प्रकरणात जोडले जाईल. 3 मार्च रोजी संध्याकाळी अटक केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी न्यायाधीशांसमोर हजर होईपर्यंत तिला झोपू दिली नाही, असा आरोप रान्याने केला आहे. 

हेही वाचा - सोन्याच्या तस्करीत कन्नड अभिनेत्री अडकल्याने खळबळ! 14.8 किलो सोन्यासह विमानतळावर अटक

न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज -  

दरम्यान, शुक्रवारी आर्थिक गुन्हे न्यायालयाने राण्या रावचा जामीन अर्ज फेटाळला. रान्या रावला 3 मार्च रोजी बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून 12.56 कोटी रुपयांच्या 14 किलो सोन्याच्या बारांसह अटक करण्यात आली. या प्रकरणात अभिनेत्रीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
 


सम्बन्धित सामग्री