नवी दिल्ली: एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका वैमानिकाचा बुधवारी मृत्यू झाल्याची माहिती एअरलाइनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अरमान चौधरी असे या वैमानिकाचे नाव आहे. त्यांचे वय केवळ 36 वर्षांचे होते. श्रीनगरहून उड्डाण केल्यानंतर त्यांनी विमान दिल्ली विमानतलावर सुखरूपपणे उतरवले. लँडिंगनंतर अचानक वैमानिकाची तब्येत बिघडली, असे एका सूत्राने सांगितले. अरमान यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
संबंधित वैमानिकाने श्रीनगरहून दिल्लीपर्यंत विमाना उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केले. मात्र, दिल्ली विमानतळावर विमान उतरविल्यानंतर अचानक वैमानिकाला प्रकृती अस्वस्थ वाटू लागली, असे एका सूत्राने सांगितले. लँडिंगनंतर अरमान यांना कॉकपिटमध्येच उलट्या झाल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा - Tahawwur Rana : लँडिंगनंतर तहव्वूर राणाचा पहिला फोटो आला समोर; आता फासावर लटकणार की तुरुंगात सडणार?
एअर इंडिया एक्सप्रेसने गुरुवारी यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी करत सांगितले, आम्ही आमच्या एका सहकाऱ्याच्या वैद्यकीय समस्येमुळे झालेल्या निधनाबद्दल अत्यंत दु:ख व्यक्त करतो. ही अतिशय वेदनादायक घटना आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत.
एका सूत्रानुसार, अरमान चौधरी 'नागरी विमान वाहतूक नियमांच्या उड्डाण कर्तव्य वेळेच्या मर्यादेत' विमान उड्डाण करत होते. "एक वैमानिक सात दिवसांत 35 तासांपेक्षा जास्त उड्डाण करू शकत नाही. कॅप्टन अरमान यांनी गेल्या सात दिवसांत 11 तास उड्डाण केले होते," असे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी, त्यांनी दिल्लीहून श्रीनगरला विमान प्रवास केला आणि नंतर दिल्लीला परतले.
दरम्यान, या घटनेबाबत कोणतीही तर्कवितर्क न करण्याचे आणि संबंधितांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन एअर इंडिया एक्सप्रेसने केले आहे. यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांशी सहकार्य करत असल्याचेही एअरलाइनने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Tahawwur Rana Extradited: तहव्वुर राणा 2011 पासून मोदींच्या 'वॉन्टेड' लिस्टमध्ये होता; पंतप्रधानांची जुनी पोस्ट व्हायरल
संबंधित वैमानिकाच्या निधनामुळे एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये शोककळा पसरली आहे. कर्मचारी वर्ग आणि सहकारी वैमानिकांनीही त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.