13 Delhi councillors resign from AAP प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
नवी दिल्ली: दिल्लीतील सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आम आदमी पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 13 नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. बंडखोर नेत्यांमध्ये मुकेश गोयल यांचाही समावेश आहे, जे दिल्ली महानगरपालिकेत (आप) आपचे सभागृह नेते होते. शनिवारी, गोयल यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी नावाच्या नवीन पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत गोयल यांनी आदर्श नगरमधून आपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता.
या नगरसेवकांनी दिले राजीनामे -
तिसऱ्या आघाडीचे म्हणजेच इंद्रप्रस्थ विकास पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक मुकेश गोयल असतील. राजीनामा दिलेल्या नगरसेवकांमध्ये हेमनचंद गोयल, दिनेश भारद्वाज, हिमानी जैन, उषा शर्मा, साहिब कुमार, राखी कुमार, अशोक पांडे, राजेश कुमार, अनिल मीना, देवेंद्र कुमार आणि हिमानी जैन यांचा समावेश आहे.
हेही वाचा - केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरला अपघात; लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड
दिल्ली 13 नगरसेवकांचे राजीनामे -
सर्व नगरसेवकांनी त्यांची नावे लिहून एका साध्या कागदावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यावर राजीनाम्याची घोषणा आणि त्याचे कारण दिलेले आहे. ज्यावर लिहिले आहे की, आम्ही सर्व नगरसेविका 2022 मध्ये आम आदमी पक्षाच्या तिकिटावर दिल्ली महानगरपालिकेत निवडून आलो होतो, परंतु 2022 मध्ये दिल्ली महानगरपालिकेत सत्तेत येऊनही पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व दिल्ली महानगरपालिका सुरळीत चालवू शकले नाही. वरिष्ठ नेतृत्व आणि नगरपालिका नगरसेवकांमध्ये जवळजवळ कोणताही समन्वय नव्हता ज्यामुळे पक्ष विरोधी पक्षात आला. अशा परिस्थितीत, जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू न शकल्यामुळे, आम्ही खालील नगरसेवक पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत.
हेही वाचा - आता उपग्रहाद्वारे ठेवण्यात येणार शत्रूवर नजर! ISRO उद्या लाँच करणार 'हा' उपग्रह
सत्ता गमावल्यानंतर आममध्ये अंतर्गत कलह -
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का बसला. सत्ता गमावल्यानंतर आप पक्षाला अंतर्गत कलहाचा सामना करावा लागत आहे. पक्षातील मतभेद रोखण्यासाठी, 'आप'ने मार्चमध्ये संघटनात्मक बदल केले होते. परंतु, आता नगरसेवकांनी आपला रामराम ठोकला आहे.