terrorists killed in manipur
terrorists killed in manipur
मणिपूर : मणिपूरमधील चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. लष्कराच्या पूर्व कमांडने एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. आसाम रायफल्सकडून 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यात झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सने 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ, राजधानी इम्फाळपासून 130 किमी अंतरावर ही चकमक झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याची माहिती लष्कराच्या पूर्व कमांडने एक्स पोस्टवर दिली आहे.
हेही वाचा : खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक; मुख्यमंत्र्यांकडून खेळाडूंचे अभिनंदन
मणिपूरमध्ये चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा
मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यात चकमकीत आसाम रायफल्सकडून 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जिल्ह्यातील डोंगराळ भागात भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राजधानी इम्फाळपासून 130 किमी अंतरावर ही चकमक झाली. गुरुवारी सकाळीही ही कारवाई सुरू होती आणि ती संपल्यानंतरच अधिक माहिती दिली जाईल, असे कोहिमा येथील संरक्षण दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. चंदेल जिल्ह्यातील खेंगजोय तहसीलमधील न्यू समताल गावाजवळ सशस्त्र व्यक्तींच्या हालचालींबद्दल विशिष्ट गुप्त माहितीवरून आसाम रायफल्स युनिटने 14 मे रोजी कारवाई सुरू केली. यावेळी संशयित व्यक्तींनी सैन्यावर गोळीबार केला. ज्याला जवानांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. यानंतर झालेल्या गोळीबारात 10 जणांना ठार करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याची माहिती लष्कराच्या पूर्व कमांडने एक्सवरील पोस्टमध्ये दिली आहे.