Sunday, August 17, 2025 03:57:32 PM

'महाकुंभातही 50-60 जणांचा मृत्यू झाला होता'; बेंगळुरूमधील चेंगराचेंगरीच्या घटनेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया

आता बेंगळुरूच्या चेंगराचेंगरीनंतर राजकारणही सुरू झाले आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की, अपघातानंतरही सरकार खेळाडूंसोबत आनंद साजरा करत राहिले आणि उपमुख्यमंत्री सेल्फी काढण्यात व्यस्त होते.

महाकुंभातही 50-60 जणांचा मृत्यू झाला होता बेंगळुरूमधील चेंगराचेंगरीच्या घटनेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया
Karnataka Chief Minister Siddaramaiah
Edited Image

बेंगळुरू: बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत बुधवारी 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 33 जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे, तर कर्नाटक सरकारने चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि 15 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. बुधवारी, बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट क्रमांक 6 वर आरसीबीच्या आयपीएलमधील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते स्टेडियमबाहेर जमले होते. त्यावेळी चेंगराचेंगरीची घटना घडली. 

कर्नाटक सरकारचा क्रिकेट असोसिएशनला दोष - 

दरम्यान, आता या चेंगराचेंगरीनंतर राजकारणही सुरू झाले आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की, अपघातानंतरही सरकार खेळाडूंसोबत आनंद साजरा करत राहिले आणि उपमुख्यमंत्री सेल्फी काढण्यात व्यस्त होते. त्याच वेळी, कर्नाटक सरकारने जबाबदारी का झटकून टाकली आहे आणि क्रिकेट असोसिएशनला दोष दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले आहे की, 'महाकुंभादरम्यानही चेंगराचेंगरी झाली होती. अशा घटनांवर राजकारण करू नये. अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या, कुंभमेळ्यातही 50-60 लोकांचा मृत्यू झाला. मी टीका केली नाही. त्यावेळी मी किंवा माझ्या सरकारने कोणतीही टिप्पणी केली नाही. विरोधी पक्षाने काय म्हटले यावर मला काहीही बोलायचे नाही.'

हेही वाचा - आता IPL विजेत्या संघाला मर्यादेत आनंद साजरा करावा लागणार; BCCI आणणार नवीन पॉलिसी

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, लोकांनी स्टेडियमचे दरवाजेही तोडले ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. कोणालाही इतक्या मोठ्या गर्दीची अपेक्षा नव्हती. स्टेडियमची क्षमता फक्त 35 हजारलोकांची आहे, परंतु सुमारे 2 ते 3 लाख लोक जमले होते. बेंगळुरू शहरात उपलब्ध असलेले संपूर्ण पोलिस दल तैनात करण्यात आले होते. तथापि, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर पसरलेले आरसीबी चाहत्यांच्या चप्पल आणि बूट हे आरसीबीच्या विजयाच्या उत्सवादरम्यान झालेली चेंगराचेंगरी किती भयानक होती हे सांगण्यासाठी पुरेसे आहे. बंगळुरू चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांपैकी 6 जणांचा बोरिंग हॉस्पिटलमध्ये, 4 जणांचा वैदेही हॉस्पिटलमध्ये आणि एकाचा मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तथापि, 33 जखमींवर उपचार अजूनही सुरू आहेत.

हेही वाचा - चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक जखमी

मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत - 

कर्नाटक सरकारने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. परंतु बंगळुरू चेंगराचेंगरीत 11 जणांच्या मृत्यूनंतर, सर्वात महत्त्वाचा प्रश्न उद्भवत आहे की, या 11 जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडू लागला आहे. तथापी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चेंगराचेंगरीसाठी थेट क्रिकेट असोसिएशनला जबाबदार धरले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री