Asaram Interim Bail Extended: अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सोमवारी राजस्थान उच्च न्यायालयाने 30 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने सुरत बलात्कार प्रकरणात आसारामला तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
राजस्थान उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने सोमवारी या संदर्भात आदेश जारी केला. तथापि, पीडितेने आसारामचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी याचिका देखील दाखल केली होती, ज्याची सुनावणी न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर यांच्या खंडपीठासमोर झाली. गुजरात उच्च न्यायालयानेही आसारामला वैद्यकीय कारणास्तव 30 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
हेही वाचा - LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढणार! एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला
दरम्यान, 2013 च्या बलात्कार प्रकरणात 86 वर्षीय आसाराम यांना 2023 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांनी उच्च न्यायालयात सहा महिन्यांच्या तात्पुरत्या जामीन अर्ज दाखल केला होता ज्यामध्ये त्यांच्या वकिलाने पंचकर्म थेरपी घेण्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्यावर युक्तिवाद केला होता. या उपचारांना 90 दिवस लागतात. 2 एप्रिल रोजी जोधपूर उच्च न्यायालयातही या प्रकरणाची सुनावणी झाली, तेव्हा खंडपीठाने दिलासा देण्यास नकार दिला होता.
हेही वाचा - Excise Duty on Petrol-Diesel: पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
सध्या आसारामवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलत न्यायालयाने आता 30 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तथापी, पीडितेच्या वतीने अंतरिम जामीन रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. पीडितेच्या बाजूच्या वकिलाने सांगितले की, आसारामने न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामीन सूचनांचे उल्लंघन केले आहे. यावर आसारामच्या वकिलाने आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.