Sunday, August 17, 2025 05:12:33 PM

Blinkit Ambulance: ब्लिंकिटच्या 10 मिनिटांच्या रुग्णवाहिकेमुळे वाचला रुग्णाचा जीव

ब्लिंकिटने अलीकडेच 10 मिनिटांत रुग्णवाहिका सेवा सुरू केली. अलीकडेच, ब्लिंकिटच्या या सेवेच्या मदतीने, रुग्णाला वेळेवर रुग्णालयात नेणे शक्य झाले, ज्यामुळे डॉक्टरांना त्याचा जीव वाचविण्यात मदत झाली.

blinkit ambulance ब्लिंकिटच्या 10 मिनिटांच्या रुग्णवाहिकेमुळे वाचला रुग्णाचा जीव
Blinkit Ambulance saves patients life
Edited Image

Blinkit’s 10-Minute Ambulance Saves Life: क्विक कॉमर्स सेगमेंटमधील मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ब्लिंकिटने अलीकडेच 10 मिनिटांत रुग्णवाहिका सेवा सुरू केली. या सेवेचा उद्देश रुग्णाला लवकरात लवकर रुग्णवाहिका पोहोचवणे हा आहे. अलीकडेच, ब्लिंकिटच्या या सेवेच्या मदतीने, रुग्णाला वेळेवर रुग्णालयात नेणे शक्य झाले, ज्यामुळे डॉक्टरांना त्याचा जीव वाचविण्यात मदत झाली. यासंदर्भात माहिती देताना डॉ. मनन व्होरा यांनी ऑनलाइन प्रोफेशनल प्लॅटफॉर्म लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ब्लिंकिटने त्यांच्या रुग्णवाहिका सेवेद्वारे 10 मिनिटांत रुग्णालयात पोहोचवून एका रुग्णाचा जीव वाचवला.    

ब्लिंकिट रुग्णवाहिकेत आवश्यक सुविधा -  

डॉ. व्होरा यांनी सांगितलं की, रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका 10 मिनिटांत रुग्णालयात पोहोचली. यासोबतच, रुग्णवाहिकेत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी आवश्यक ती सुविधा देण्यात आली. रुग्णाला रुग्णालयात नेण्यापूर्वी, त्याच्या सी-स्पाइनला हार्ड सर्व्हायकल कॉलरने स्थिर करण्यात आले आणि वायुमार्ग साफ करण्यासाठी आपत्कालीन सक्शन करण्यात आले. 

हेही वाचा - 'ऑफिसमध्ये 60 तास काम करा नाहीतर...'; गुगलच्या मालकाचे कर्मचाऱ्यांना नवे फर्मान

ब्लिंकिट रुग्णवाहिका प्रभावी ठरणार - 

याशिवाय रुग्णाला रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सपोर्ट आणि आवश्यक औषधे देखील देण्यात आली. डॉ. व्होरा यांनी यावेळी नमूद केलं की, भारतात रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी या पातळीची काळजी क्वचितच उपलब्ध असते. रुग्णांना योग्य स्थिरीकरण न करता रुग्णालयात पोहोचवले जाते. ज्यामुळे अधिक गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. तथापि, व्होरा यांनी म्हटलं की, ही अत्यावश्यक सेवा सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आणि परवडणारी राहिली तरचं ती प्रभावी होईल.

हेही वाचा - फक्त 250 रुपयांना खरेदी केलेल्या पेंटिंगचा लिलाव ठरला 'इतक्या' लाखांना; किंमत ऐकून व्हाल अवाक! काय आहे प्रकरण? जाणून घ्या

ब्लिंकिट अॅपद्वारे रुग्णवाहिका बुकिंग - 

दरम्यान, ब्लिंकिटने गुरुग्राममध्ये क्विक-रिस्पॉन्स रुग्णवाहिका सेवा सुरू केली होती. शहरी भागात विश्वासार्ह आपत्कालीन वैद्यकीय मदत प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ही सेवा पाच रुग्णवाहिकांनी सुरू करण्यात आली. ब्लिंकिट अॅपद्वारे रुग्णवाहिका बुकिंग करता येते. ही सेवा लवकरच इतर शहरांमध्येही सुरू केली जाईल. 

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची 10 मिनिटांत डिलिव्हरी - 

अलीकडेच, ब्लिंकिटने 10 मिनिटांत लॅपटॉप, प्रिंटर, मॉनिटर्स आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची डिलिव्हरी सेवा सुरू करण्याची माहिती दिली होती. ब्लिंकिटच्या या सेवेमध्ये स्मार्टफोनची डिलिव्हरी देखील समाविष्ट असेल. दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू आणि मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक्सची 10 मिनिटांची डिलिव्हरी सेवा सुरू करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री